मुंबई - मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांचे नाते दिवसेंदिवस बहरताना दिसते. या कार्यक्रमातच त्यांच्या प्रेमाला अंकुर फुटला होता. कार्यक्रम संपल्यानंतरही दोघांनी आपले नाते जगजाहीर केले. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे येत्या 'व्हॅलेंटाईन डे' शिव - वीणाचा काय प्लॅन असेल, याची चाहत्यांना उत्सुकता होती.
शिव आणि वीणाचा येत्या व्हॅलेंटाईन डेला एक म्यूझिक अल्बम प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात दोघांचाही रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळणार आहे. शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 'कसा चंद्र' असे या गाण्याचे बोल आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -सारा-कार्तिकचे चाहत्यांसाठी नवे चॅलेंज, व्हायरल होतोय व्हिडिओ
अवधुत गुप्तेने हे गाणं कंपोझ केले आहे. तर, स्वप्निल बांदोडकरचा स्वरसाज या गाण्याला लाभला आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात रोमॅन्टिक कपल अशी ओळख असलेल्या शिव वीणाची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
- View this post on Instagram
🌟Coming soon ❤️😉........🌟🎥 🌟14th FEB 😍 ⭐️Guess who...?? #dreamer #ziddi #marathimulga #
">
हेही वाचा -'दबंग गर्ल'ची डिजीटल विश्वात एन्ट्री, गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिजमध्ये साकारणार भूमिका