मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचा ७ वर्षाचा मुलगा डब्लूडब्लूईबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. विशेषतः त्याने या खेळाविषयी दाखवलेली आपली हुशारी आणि जॉन सीनावरचे प्रेम यामुळे हा चिमुकला या खतरनाक खेळाचा किती मोठा फॅन आहे हे लक्षात येते.
शिल्पाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिचा मुलगा विआन प्रकाश झोतात आला आहे. त्याच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिल्पाने व्हिडिओ शेअर करीत लिहिले होते, ''OMG ! माझा मुलगा विआन याने पहिल्याच सोलो मुलाखतीत डब्लूडब्लूई आणि जॉन सीनाबद्दलचे प्रेम व्यक्त केले. त्याला इतके सारं माहिती आहे याची कल्पना मला नव्हती. त्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल डब्लूडब्लूई इंडियाचे याबद्दल खूप आभार.''
-
After @TheShilpaShetty’s son, @ViaanRajKundra expressed his love for @WWE and his all-time favourite Superstar @JohnCena, he sat down to discuss this more with #WWENowIndia host @Ga3lyn and even received a special message from the 16-time World Champion. pic.twitter.com/0ebnDLIx0r
— WWE (@WWEIndia) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">After @TheShilpaShetty’s son, @ViaanRajKundra expressed his love for @WWE and his all-time favourite Superstar @JohnCena, he sat down to discuss this more with #WWENowIndia host @Ga3lyn and even received a special message from the 16-time World Champion. pic.twitter.com/0ebnDLIx0r
— WWE (@WWEIndia) July 9, 2019After @TheShilpaShetty’s son, @ViaanRajKundra expressed his love for @WWE and his all-time favourite Superstar @JohnCena, he sat down to discuss this more with #WWENowIndia host @Ga3lyn and even received a special message from the 16-time World Champion. pic.twitter.com/0ebnDLIx0r
— WWE (@WWEIndia) July 9, 2019
विशेष म्हणजे या व्हिडिओच्या अखेरीस जॉन सीनाने विआनला व्हिडिओ मेसेज दिला आहे. त्याचा मेसेज पाहून छोटा विआन आनंदाने उड्या मारताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये जॉन सीना म्हणतो, "विआन, मी तुझा जॉन सीना बोलतोय. मी तुझा व्हिडिओ आणि तुझे मसल पाहिले. मला परत जीममध्ये जावे लागेल आणि पुन्हा व्यायाम सुरू करावा लागेल. तू एकदम भारी आहेस. माय टाईम इज अप, युवर टाईम इज नाऊ हे गाणे तू गाताना मला पाहायचे आहे. विआन मुला, आता तू चमकत आहेस."
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने युके स्थित बिझनेसमन राज कुंद्रा यांच्यासोबत २००९ मध्ये विवाह केला होता. या दांपत्याला २०१२ मध्ये विआन हा मुलगा झाला होता.