ETV Bharat / sitara

शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर 4' च्या सेटवर परतल्यावर झाली भावुक - शिल्पा शेट्टी शुटिंगच्या सेटवर परतली

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लिल व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर शिल्पाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ती सुपर डान्सर 4 या डान्स रिअॅलिटी शोच्या जज पॅनेलमधूनही गायब झाली होती. जवळजवळ एक महिन्यानंतर शिल्पाने कॅमेऱ्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर परतली. सेटवर शिल्पा शेट्टी परतल्यानंतर सह परिक्षक असलेल्या चित्रपट निर्माते अनुराग बासू आणि नृत्यदिग्दर्शक गीता कपूर यांनी तिचे स्वागत केले. मंगळवारी शिल्पाने एका एपिसोडचे शूटिंग केले, हा भाग या विकेंडला प्रसारित होणार आहे.

शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर 4' च्या सेटवर परतली

author img

By

Published : Aug 18, 2021, 6:43 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर शेट्टी-कुंद्रा परिवारावर टीकेचा भडीमार सुरु झाला होता. मुंबई पोलिसांच्या या कारवाईने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. शिल्पा शेट्टीवर सुद्धा नेटकऱ्यांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली होती आणि जनक्षोभ आपल्याविरुद्ध आहे हे जाणून शिल्पा शेट्टी घराबाहेरसुद्धा पडली नव्हती. डान्स रियालिटी शो सुपर डान्सर मध्ये ती अनुराग बसू आणि गीता कपूर सोबत परीक्षकांची भूमिका पार पाडत होती. परंतु अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे ती नक्कीच भांबावून गेली होती आणि तिने सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या शूटिंगला दांडी मारली. या कार्यक्रमाच्या पुढील काही भागांमध्ये इतर सेलिब्रिटीजना आमंत्रित करून आयोजकांनी वेळ मारून नेली.

शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर 4' च्या सेटवर परतली

नुकत्याच चित्रपटसृष्टीने कोविडग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये शिल्पाने हजेरी लावली आणि ती आता सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असल्याची जणू झलक दिली. आता तर शिल्पा शेट्टी थेट सुपर डान्सरच्या सेटवर पोहोचली आणि पुढील भागांच्या चित्रीकरणामध्ये भाग घेतला. काल-परवाच एका मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग बसू यांनी ‘आम्ही सर्व सुपर डान्सर ची टीम शिल्पा ला मिस करीत आहोत’ असे विधान केले होते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे वाहिनी आणि परीक्षक यांच्या कायदेशीर करार झालेले असतात आणि दोघांकडूनही त्यांचे पालन केले जात असते. अनपेक्षित घटनाक्रमांमुळे काही पर्यायी उपाय योजण्यात आले होते आणि आता राज कुंद्रा ला कोर्टाकडून थोडाफार दिलासा मिळाल्यामुळे शिल्पाने धीटपणे हे पाऊल उचलले असावे.

जेव्हा शिल्पा शेट्टी कुंद्रा, तीनेक आठवड्यांच्या गॅपनंतर, सुपर डान्सर च्या सेटवर पोहोचली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले. ‘आपल्या कुटुंबातील महत्वाच्या सदस्याचे पुनरागमन झाले आहे’, असे म्हणत स्पर्धक, नृत्यदिग्दर्शक, परीक्षक आणि संपूर्ण सुपर डान्सर ४ च्या कुटुंबाकडून तिचे मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. तिच्या येण्याने छोटे स्पर्धक खूष झाले असून मोठ्या उत्साहात सुपर डान्सर चॅप्टर ४ चे या विकेंडला प्रदर्शित होणाऱ्या भागांचे चित्रीकरण पार पडले.

हेही वाचा - 'इम्रान'सोबत कंगना डेट करीत असल्याचा केआरकेचा दावा... म्हणतो, "हा तर लव्ह जिहाद"

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.