ETV Bharat / sitara

करिनाने घेतली 'सासू'ची मुलाखत, तैमूरबद्दल काय म्हणाल्या माहितेय का?

कपूरने 'इश्क' या रेडिओ शोमध्ये सासू शर्मिला टागोर यांची मुलाखत घेतली. अनेक विषयावर रंगलेल्या मुलाखतीत अनेक सल्ले शर्मिला टागोर यांनी दिले.

Kareena Kapoor Khan interview
करिनाने घेतली 'सासू'ची मुलाखत
author img

By

Published : Dec 13, 2019, 4:59 PM IST

Updated : Dec 13, 2019, 5:04 PM IST

मुंबई - अभिनेत्री करिना कपूरच्या रेडिओ शो 'इश्क'मध्ये पहिल्यांदाच तिच्या सासूबाई शर्मिला टागोर आल्या होत्या. यावेळी त्यांनी तैमूरला मिळत असलेल्या अमाप प्रसिध्दीबद्दल चर्चा केली. करिनाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना शर्मिला टागोर म्हणाल्या की, "एका क्षणाला मीडिया लोकांना एका उंचीवर घेऊन जातो, तर दुसऱ्या क्षणाला खाली आणतो." तैमूरबद्दल बोलताना सांगितलं की, "उद्या जर विराट आणि अनुष्काला मूल झालं तर ते तैमूरला कव्हर करणे बंद करतील."

हेही वाचा - मराठमोळ्या 'दंगल गर्ल'चा गाव ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनोखा प्रवास

करिनाने चर्चेत विचारले की मुलगी आणि सून यांच्यात फरक काय आहे? याचे उत्तर देताना शर्मिलांनी सांगितले की, "मुलगी ती आहे जिच्यासोबत तुम्ही म्हातारे झालात. होय ना ? त्यामुळे तुम्ही तिच्या स्वभावाबद्दल जाणता. तुम्हाला माहिती असते की कोणत्या गोष्टीचा तिला राग येतो, ती गोष्ट तुम्ही सांभाळता. तुम्ही सूनेला तेव्हा भेटता जेव्हा ती वयस्क आहे आणि तुम्हाला माहिती नसते की, तिचा स्वभाव काय आहे. त्यामुळे मिळून मिसळून घ्यायला थोडा वेळ लागतो. एक नवीन मुलगी जेव्हा तुमच्या घरी येते तेव्हा तिचे स्वागत करणे आवश्यक आहे."

हेही वाचा - एकदम कडक..! पन्हाळा गडावरील 'झुणका भाकर' पुन्हा तेजीत

करिनाने सासूबाईंना एक तिरका प्रश्न विचारला. "तुमच्या डोळ्यातील सितारा कोण आहे, तैमूर, सारा, इब्राहिम की इनाया?" याला शर्मिला टागोर यांनी जबरदस्त उत्तर दिले, "मला अजून जगायचे आहे आणि जाहीरपणे निश्चित सांगू शकत नाही. ते प्रत्येकजण एकमेकांहून वेगळे आहेत. हे खूप चांगले आहे की, मला एक नात आणि नातू मोठे आहेत आणि दोन छोटे आहेत. या दोन्हीतही मला आनंद मिळतो. साराची मुलाखत मला खूप आवडली. यात इब्राहिम असा आहे, जो खरोखर पतौडी वाटतो."

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.