ETV Bharat / sitara

स्पिलबर्ग यांच्या 'हॅलो'मध्ये झळकणार शबाना आझमी

अभिनेत्री शबाना आझमी लवकरच स्टीव्हन स्पिलबर्ग यांची निर्मिती असलेल्या 'हॅलो' या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. बुडापेस्टमध्ये यावेब सिरीजचे शूटींग होणार आहे. ओट्टो बॅथर्स्ट याचे दिग्दर्शन करणार आहेत.

शबाना आझमी
author img

By

Published : Aug 5, 2019, 5:53 PM IST

लॉस एंजेलिस - ख्यातनाम भारतीय अभिनेत्री शबाना आझमी लवकरच स्टीव्हन स्पिलबर्ग यांची निर्मिती असलेल्या 'हॅलो' या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. 'हॅलो' या नावाने गाजलेल्या व्हिडिओ गेमवरुन ही मालिका बनत आहे. यात आंतरराष्ट्रीय कलाकार नताशा मॅकइलहोन, बोकीम वडबिन, बेन्ट्ले कालू, नताशा कुलझॅक, आणि केट केन्नडी यांच्या प्रमुख भूमिका असतील.

बुडापेस्टमध्ये यावेब सिरीजचे शूटींग होणार आहे. ओट्टो बॅथर्स्ट याचे दिग्दर्शन करणार असून मॅकइलहोन दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत.

शबाना आझमी या वेब सिरीजमध्ये अॅडमिरल मार्गारेट पॅरागोन्स्की या नेवल इंटेलिजन्सची भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी शबाना यांनी मॅडम सोसात्झ्का, ला न्यूट बेन्गाली, सिटी ऑफ जॉय आणि सन ऑफ पिंक पँथर या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. तसेच बांग्लाटाऊन बँक्वेट, कॅपीटल आणि नेक्स्ट ऑफ किन या सहा भागांच्या सिरीजमध्ये काम केले होते.

'हॅलो' ही मालिका शोटाईम यांची ३४३ इंडस्ट्रीज आणि अँबलीन टेलीव्हिजन यांची संयुक्त निर्मिती असेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.