मुंबई - दहशतवादी स्फोट घडवून आणल्याच्या प्रकरणात तथाकथित साध्वी प्रज्ञाला भोपाळमधून भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेद्वारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण बरेच तापले आहे. अशातच साध्वी प्रज्ञाने मुंबई हल्ल्यात वीरमरण पावलेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. हेमंत करकरेंचा सर्वनाश व्हावा असा शाप मी दिला होता, असे साध्वीने म्हटले होते. साध्वीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. सर्वच थरातून याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत.
बॉलिवूडचा पटकथा लेखक आणि प्रसिध्द गीतकार वरुण ग्रोव्हरने साध्वी प्रज्ञाच्या या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. वरुण ग्रोव्हरचे हे ट्विट आता व्हायरल झाले आहे.
-
JUST. NO. WORDS.
— वरुण (@varungrover) April 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
BJP's Bhopal candidate and a terror accused is openly bragging about wishing the death of our 26/11 hero ATS Chief Hemant Karkare and claiming Kasab & team as her ally in this wish. pic.twitter.com/5ltgNjtEfr
">JUST. NO. WORDS.
— वरुण (@varungrover) April 19, 2019
BJP's Bhopal candidate and a terror accused is openly bragging about wishing the death of our 26/11 hero ATS Chief Hemant Karkare and claiming Kasab & team as her ally in this wish. pic.twitter.com/5ltgNjtEfrJUST. NO. WORDS.
— वरुण (@varungrover) April 19, 2019
BJP's Bhopal candidate and a terror accused is openly bragging about wishing the death of our 26/11 hero ATS Chief Hemant Karkare and claiming Kasab & team as her ally in this wish. pic.twitter.com/5ltgNjtEfr
साध्वी प्रज्ञाच्या वादग्रस्त विधानावर कॉमेंट करताना वरुण ग्रोव्हरने लिहिलंय, "आता शब्दच खुंटलेत. भाजपची भोपाळची उमेद्वार आणि दहशतवादी हल्ल्याची आरोपी उघडपणे म्हणतेय की, तिने २६/११ चे हिरो एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूची कामना केली होती आणि अशा प्रकारचा दावा करीत आहे की, कसाब आणि त्याच्या टीमने तिची इच्छापुर्ती केली.", या शब्दात वरुण ग्रोव्हरने आपले मत मांडलंय. वरुण ग्रोव्हरने नेटफ्लिक्सवरील सुपरहिट सीरीज 'सेक्रेड गेम्स'ची स्क्रिप्ट लिहिली होती. याशिवाय त्याने 'फॅन', 'उड़ता पंजाब' आणि 'सोनचिड़िया' यासारख्या चित्रपटांसाठी गाणीही लिहिली आहेत.