ETV Bharat / sitara

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या सांगितिक कारकिर्दीला सावनी रविंद्रची 'दीदी' व्दारे मानवंदना - सावनी रविंद्रची 'दीदी' व्दारे मानवंदना

सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रचा ‘दीदी’ हा शो नुकताच मुंबईत लाँच झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारीत ‘दीदी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती गायिका सावनी रविंद्रनेच केलेली आहे.

Savani Ravindras
सावनी रविंद्र
author img

By

Published : Feb 1, 2020, 4:30 PM IST

गानसरस्वती लता मंगेशकर आणि मेलोडी क्विन आशा भोसले याांच्या गाजलेल्या गीतांचा नजराणा घेऊन या अगोदर ‘लताशा’ कार्यक्रमाची निर्मिती सावनीने केली होती. त्यामध्ये सावनीच्या आवाजातल्या सुरेल गीतांसोबतच दस्तुरखुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकरांकडून त्या गाण्यांविषयीचे विवेचन ऐकायला मिळणे ही कानसेनांसाठी पर्वणीच होती. आता ‘दीदी’ या हिंदी कार्यक्रमामध्ये सावनीच्या गीतांसोबतच अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे प्रभावी निवेदन ही कानसेनांसाठी मेजवानीच ठरतेय.

दीदी कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी गायिका सावनी रविंद्र म्हणते, “अलौक आणि दैवी आवाजाच्या लतादीदींचा 90वा वाढदिवस आपण साजरा केला. त्यांच्या दैदीप्यमान कारकिर्दीला माझ्याकडून मानाचा मुजरा करावा असं वाटल्याने या कार्यक्रमाची निर्मिती केली. दीदींचे हिंदी सिनेसृष्टीच्या योगदानातल्या महत्वाच्या गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीतल्या निवडक तीस गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आलाय.”

सावनी रविंद्र पूढे म्हणते, “दीदींची गाणी गाणे हे एक शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. पण हे चॅलेंज उचलायला मला आवडतं. या वर्षाच्या सुरूवातीला पुण्यामध्ये कानसेनांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्यावर मायानगरी मुंबईनेही भरघोस प्रतिसादाने पाठ थोपटल्याने आता या कार्यक्रमाचे अजून शो करण्यासाठी हुरूप आला आहे.”

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.