मुंबई - बिग बॉसच्या चौदाव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अशात आता या शोच्या चित्रीकरणाबाबतची बातमी समोर आली आहे. या शोच्या प्रोमोचे चित्रीकरण अभिनेता सलमान खान आपल्या फार्महाऊसमध्ये करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सलमानच्या या रिअॅलिटी शोच्या पुढील सीझनबाबत चाहत्यांकडून अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. बिग बॉसच्या चौदाव्या सीझनविषयी इंटरनेटवर अनेक चर्चा रंगल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या शोसाठीची तयारीही निर्मात्यांनी सुरु केली आहे.
इंडस्ट्रीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान लवकरच आपल्या पनवेल येथील हार्महाऊसमध्ये बिग बॉसचा प्रोमो शूट करणार आहे. यासाठी तो सोशल डिस्टन्सिंगचा सराव करणार आहे. शोचा प्रोमो सोशल डिस्टन्सिंगवरच आधारित असणार आहे. बिग बॉस 14 मधील स्पर्धकांबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.