मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातील एकमहान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे,स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’या मालिकेतून. आंबेडकरांनी समता,बंधुता, लोकशाही,स्वातंत्र्य,जागतिक अर्थकारण आणि राजकारण याविषयीमांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते.महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूनेया मालिकेची निर्मिती केली आहे.
अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे. या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तुत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
सामाजिक,राजकीय,आर्थिक,शैक्षणिक,पत्रकारिता,कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महानकार्य उलगडण्याचा प्रयत्नया मालिकेतून करण्यात येईल.येत्या १५ एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या भव्यदिव्य मालिकेविषयी म्हणाले,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गौरवशाली कार्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महामानवाचं हे महान कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे. टीव्ही हे अत्यंत प्रभावशील माध्यम असल्यामुळे प्रत्येक जनमानसात डॉ. आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजला जावा यासाठी स्टार प्रवाहची संपूर्ण टीम प्रयत्नशील असेल.’