शिर्डी - कोरोना महामारीमुळे अनेक छोटया मोठया कलावंतांवर उपासमारीची वेळ आले आहे. यातीलच तमाशा कलावंत देखली मोठ्या अडचणीत सापडले असल्याने यांच्या मद्दतीसाठी आता शिर्डीकर धावून आले आहेत. तमाशा कलावंत जगला पाहीजे म्हणून शिर्डीतील ग्रामस्थांनी १ लाख रूपयांची मद्दत रघुवीर खेड़कर यांच्याकडे सुपुर्त केली आहे.
शिर्डी साईबाबा हयात असताना स्वतः कलावंताची आदर करायचे व मानधन द्यायचे. हीच परंपरा आज शिर्डीकरानी कायम ठेवली असल्याच पाहायला मिळाले. गेल्या 75 वर्षापासून रघुवीर खेडकर यांचा तमाशा शिर्डीत श्रीरामनवमी यात्रा दरम्यान भरयाचा. मात्र गेल्या वर्षाभरापासून देशावर व राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असल्याने मागील वर्षी आणि या वर्षी शिर्डीतील यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र गेल्या 75 वर्षापासून शिर्डीकराना मनोरंजनाचा आनंद देणारे तमाशा कलावंतदेखील या कोरोनाचा संकटात सापडले असल्याने त्यांना एक मदत म्हणून शिर्डीकरानी तब्बल १ लाख रूपयांची मद्दत आज रघुवीर खेड़कर यांच्याकडे सुपुर्त केली आहे.
यावेळी बोलताना रघुवीर खेडकर म्हणाले की, ही रक्कम नाही तर श्री साईबाबांचा प्रसाद आहे. आमच्या १३० लोकांच्या कुटूंबाला मोठा हातभार मिळाला असे बोलताना त्यांचे डोळे भरुन आले व बाबांच्या कळसासमोर नतमस्तक झाले. याप्रसंगी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब आप्पा कोते, माजी उपनगराध्यक्ष अभयभैया शेळके, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, शिवसेना नेते कमलाकर कोते, बाळासाहेब लुटे व प्रमोद गोंदकर उपस्थित होते.
हेही वाचा - ऑस्कर २०२१ : लॉस एंजल्स शहरात रंगतोय ९३व्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा