मुंबई - ऋचा चड्ढा, कल्की कोचलिन, अमायरा दस्तूर, पुल्कित सम्राट आणि आदिल हुसैनसारख्या कलाकारांनी लॉकडाऊनदरम्यान चाहत्यांसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी शांती आणि स्त्री पुरुष समानतेबाबत संदेश दिला आहे. यात हे कलाकार लॉकडाऊनमध्ये घडणाऱ्या काही मुद्द्यांवर बोलत आहेत.
व्हिडिओमध्ये कलाकार भांडी धुताना आणि जेवण बनवताना दिसत आहे. कलाकार कशाप्रकारे आपल्या घरात स्त्री पुरुष समानता ठेवत आहेत, हे सांगणारे हे व्हिडिओ आहेत. यात क्लकी सकाळी नाश्ता बनवत असल्याचे सांगत आहे तर तिचा नवरा आदिल त्याला जेवण बनवणं किती आवडतं, हे आपल्या मातृभाषेत म्हणजेच आसामीत सांगत आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे बहुतेक लोक घरांमध्येच आहेत. अशात मानसिक तणावामुळे घरगूती हिंसाचाराची शक्यता अधिक आहे. केवळ देशातच नव्हे, तर जगभरात हिच परिस्थिती आहे. याच कारणामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यात येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तर, अभिनेत्री ऋचाने सांगितलं, की भारत विविधतेने बनलेला देश आहे. त्यामुळे, सर्व लोकांपर्यत ही संकल्पना पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ वेगवेगळ्या भाषेत प्रसारित व्हायला पाहिजे. याचसाठी वेगवेगळ्या राज्यातील कलाकारांना या व्हिडिओसाठी सोबत घेतले गेले आहे. कारण, आमचा संदेश समजण्यासाठी लोकांना आधी भाषा समजणं गरजेचं आहे, असं ऋचाने म्हटलं आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी आपले व्हिडिओ शेअर करत समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.