ETV Bharat / sitara

अजानवर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘भोंगा’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. अजानवर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

National award winning film 'Bhonga' commenting on Azan
अझानवर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘भोंगा’
author img

By

Published : Jun 30, 2021, 10:49 PM IST

नमाज अदा करण्यासाठी आठवण करून देणारा भोंगा म्हणजे अजान. प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेसाठी केलेला आवाज या विषयावर आधारित चित्रपट म्हणजे ‘भोंगा’. मनाला चटका लावणारा विषय या 'भोंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

National award winning film 'Bhonga' commenting on Azan
अझानवर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘भोंगा’

'भोंगा' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच सिनेसृष्टीत बराच ‘आवाज’ केला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 'अमोल कागणे फिल्म्स' प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित आहेत. तर चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले असून या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास यांनी उत्तमरीत्या सांभाळली.

'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजानवर भाष्य करणारी आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी वाहिली आहे. या चित्रपटात दिप्ती धोत्रे, कपिल कांबळे, श्रीपाद जोशी, पवन वैद्य, आकाश घरत आणि अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अजानवर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ''रात्रीस खेळ चाले''च्या ऑल इन वन साळगावकरला 'वेध' पुन्हा मालिका सुरू होण्याचे

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.