ETV Bharat / sitara

पाहा, राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या पहिल्या डिनर डेटचे फोटो - शमिता शेट्टी आणि राकेश बापटची डिनर डेट

शमिता शेट्टी आणि राकेश बापटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शमिता बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये येण्यापूर्वी, राकेशने तिला शुक्रवारी डिनर डेटसाठी बाहेर नेले. हे जोडपे मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर हातात हात घालून स्मितहास्य करताना दिसले.

राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या पहिल्या डिनर डेटचे फोटो

author img

By

Published : Sep 25, 2021, 10:37 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मॉडेल-अभिनेता राकेश बापट यांची केमिस्ट्री बिग बॉसच्या ओटीटी मेडेन सीझनमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक होती. 8 ऑगस्टपासून सुरू झालेला त्यांच्या या मैत्रीचा प्रवास सलग 42 दिवस सुरू होता आणि त्याचे प्रसारण होत होते. शमिता या शोची सेकंड रनर-अप ठरली आहे.

शमिता बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये येण्यापूर्वी, राकेशने तिला शुक्रवारी डिनर डेटसाठी बाहेर नेले. हे जोडपे मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर हातात हात घालून स्मितहास्य करताना दिसले. शमिता आणि राकेशच्या डीनर डेटमुळे मीडियातील लोकांना खूप आनंद झाला. कारण त्याच्या मैत्रीपलीकडे काही तरी आहे असा दावा ते करीत होते. हौशी फोटोग्राफर्सना दोघांना शूट करीत असताना कमालीचा आनंद झाला होता.

राकेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरही शमिताचा हात धरलेला एक क्लोज-अप शेअर केला आहे. त्याने "यू अँड मी" असे लिहिले व लाल हृदयाचा इमोजी टाकला आहे. त्याने पोस्टवर शमिताला टॅग केले आणि #Shara या नावाने संबोधले. Shara या टोपन नावानेच त्यांना फॅन्स बोलवत असतात. शमिता आणि राकेश यांच्या आद्याक्षरांवरुन हे नाव फॅन्सनी दिले आहे.

दरम्यान, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट बिग बॉस 15 मध्ये प्रवेश करतील. तेथे ते उमर रियाज आणि डोनाल बिश्तसह इतर स्पर्धकांसह घरामध्ये दिसतील. बिग बॉसचा नवीन सिझन 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होईल आणि त्यानंतर प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता आणि शनिवारी आणि रविवारी रात्री 9.30 वाजता कलर्सवर प्रसारित होईल.

हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीचा वापर कोणत्याही देशाने स्वार्थासाठी करू नये - पंतप्रधान मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.