मुंबई - काही दिवसांपूर्वी 'बचपन का प्यार' या गाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. छत्तीगडमधील शाळेतील मुलगा सहदेव दिरदो याने हे गीत गायले होते. त्याच्या शिक्षकाने काही वर्षापूर्वी तो तिसरीत असताना हे गीत गायले. मात्र हे गाणे अलिकडे व्हायरल झाले आणि यावर हजारो लोकांनी व्हिडिओ बनवले आणि करोडो लोकांनी हे गाणे पाहिले. अशा तऱ्हेने एका रात्रीत सहदेव दिरदो हा मुलगा प्रसिध्दीस आला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सहदेव हा मूळचा सुकमा, छत्तीसगडचा रहिवासी आहे. आता तो 10 वर्षांचा आहे. आता बुधवारी रिलीज झालेल्या झालेल्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन 'बीटूगेदर प्रोस' 'BeTogether Pros' यांनी केले आहे. रॅपर बादशाह, गायिका आस्था गिल आणि संगीतकार रिको यांनी यात काम केले आहे.
'पानी पानी' आणि 'गेंदा फूल' सारखे लोकप्रिय अल्बममुळे लोकप्रिय झालेला बादशाह म्हणाला की 'युनिव्हर्सल म्युझिकसाठी' बचपन का प्यार 'ची नवीन आवृत्ती सादर करताना तो खूप उत्साहित आहे. सोशल मीडियाच्या सामर्थ्याचा प्रत्यय या गाण्यामुळे आल्याचे बादशाहने सांगितले. रिको आणि आस्था हे सहदेव या नव्या गायकाची ओळख करुन देण्यासाठी उत्साहित असल्याचेही तो म्हणाला.
या नव्या गाण्याच्या आवत्तीचे संगीत हितेन यांनी दिले असून याचे बोल बादशाहने लिहिले आहेत.
हेही वाचा -‘कोहोक’च्या कर्मवीर विशेषमध्ये मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे यांची हजेरी!