चामराजनगर ( कर्नाटक ) - सुपरस्टार रजनीकांत यांना 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या शूटींगच्यावेळी अपघात झाला आहे. रजनीकांत पडल्यामुळे त्यांना जखम झाली आहे. हा प्रकार बंदीपूर या वाघांसाठी राखीव अभयारण्यात चमन्नाहल्ला येथे घडला.
'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या शूटींगच्यावेळी रजनीकांत यांना थोडी जखम झाली असून अपघातानंतर ते शरयू रेसॉर्टमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते बंगळूरूला विमानाने रवाना झाले आहेत.
अपघातानंतर जंगल अधिकाऱ्यांनी या अपघाताची माहिती मीडियाला दिली. रजनीकांत यांना गंभीर दुखापत झाली नसून आता ते ठिक असल्याचे त्यांनी सांगितले.