ETV Bharat / sitara

लुडो चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राजकुमार राव खूश - Rajkumar Rao's Ludo is a movie

राजकुमार रावचा लुडो हा चित्रपट १२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राजकुमार रावने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Rajkumar Rao
राजकुमार राव
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:41 PM IST

मुंबई - अभिनेता राजकुमार राव आपल्या लुडो या नव्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे खूष आहे. राजकुमार राव म्हणाला, "या चित्रपटाबद्दल मिळत असलेल्या सुरुवातीच्या प्रतिसादामुळे आणि सिनेमा आणि माझे काम लोकांना आवडत असल्यामुळे मी खूप खूश आहे. लुडो खूप स्पेशल चित्रपट आहे आणि दादासोबत काम करणे जबरदस्त होते."

हेही वाचा -पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीतील १८ अर्ज बाद

तो म्हणाला, "मी खरोखर आनंदी आहे आणि माझे काम लोकांना आवडतंय त्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो. माझ्या व्यक्तीरेखेबद्दल आणि सिनेमाबद्दल लोक सोशल मीडियावरुन बोलत आहेत. त्यांचे मी आभार मानतो.''

अनुराग बसू यांनी 'लुडो' चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

हेही वाचा -सेक्युलर म्हणणारे सर्वात अधिक धर्मांध - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.