मुंबई - अभिनेता राहुल रॉयने आपल्या बहिणीने रुग्णालयात बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. बहिणीने बनवलेल्या लंचचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या तो मीरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर जेवणाचा फोटो शेअर करीत असताना लिहिलंय की, ''आज माझी बहिण प्रियंका रॉयच्या हातचा योगिक लंच. माझ्या रिकव्हरीसाठी उत्तम खाद्या पदार्थ, फळ आणि ड्रायफ्रुट्स दिले जात आहेत.''
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात राहुल रॉय याला ब्रेन स्ट्रोक झाला होता, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आगामी 'एलएसीः लाइव्ह द बॅटल इन कारगिल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यानंतर त्याला मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले होते.
हेही वाचा -नव्वदच्या दशकापासून सुपरस्टार्सचे युग मंदावाले - पंकज त्रिपाठी
त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर ८ डिसेंबर रोजी मीरा रोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्याची स्पीच थेरेपी, फिजिओ थेरपी आणि इतर उपचार चालू आहेत.
हेही वाचा -कोणत्याही उद्योगात जाण्यासाठी '3 इडियट्स' माझे व्हिजिटिंग कार्ड : आर. माधवन