नाशिक - कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. घरीच थांबून या संकटाचा सामना होऊ शकतो, यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी अनेक लोककलावंत आपल्या गाण्यातून जागृती करीत आहेत. भजन क्षेत्रातील दिग्गज गायक भजन सम्राट पंडीत रघुनाथ खंडाळकर यांनी एका गौळणीच्या चालीवर एक गीत सादर केले आहे.
'असा कसा देवांचा देव बाई ठकडा', ही गौळण पंडीत रघुनाथ खंडाळकर गात असतात. या लोकप्रिय गौळणीच्या चालीवर आधारित त्यांनी कोरोना व्हायरसवर गीत सादर केलं आहे. ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी त्यांचे हे खास गीत...