अभिनेत्री नेहा धुपियाने २०१८ साली मी महिन्यात अभिनेता अंगद बेदी (क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा सुपुत्र) यांच्यासोबत तातडीने विवाह केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांना कन्यारत्न झालं. आता तीनेक वर्षांनंतर नेहा पुन्हा गरोदर असून तिने प्रेग्नंसीमध्ये एका वेब-फिल्ममध्ये काम केलंय. ती (RSVP) ‘आरएसवीपी’ च्या आगामी थ्रिलर, 'अ थर्सडे' मध्ये दिसणार असून त्यात गर्भवती नेहा धूपिया गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रतिभाशाली अभिनेत्री नेहा धुपिया एसीपी कैथरीन अल्वारेज नामक गर्भवती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपीने ब्लू मंकी फिल्म्ससोबतच्या आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, ‘अ थर्सडे' मधील एका गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात नेहा धूपियाच्या लूकचे नुकतेच अनावरण केले. बेहजाद खंबाटाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 'ए थर्सडे' एका गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नेहा धूपियाने आपल्या सोशल मीडियावर आपला हा नवा लूक शेअर करताना लिहिले, "वास्तवातील आणि रील लाइफमधील अंतर कमी करणे. सर्व प्रकारचा पाठिंबा दिल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, धन्यावाद."
चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे, जी १६ मुलांना बंधक बनवते. या थ्रीलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.
‘अ थर्सडे' ची निर्मिती आरएसवीपी मूवीज आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा - श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अस्पष्ट रेषा पुसून टाकणारी मराठी वेबसिरीज ‘परीस’!