मुंबई - ब्रिटनमध्ये 'मिर्झापूर' मालिका लोकप्रिय असल्याचे पाहून अभिनेता पंकज त्रिपाठीला आश्चर्य वाटले. तो '83' या सिनेमाचे शूटिंग ग्लासगोमध्ये करीत असताना भारतीय चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पंकज यांना वाटले की भारतीय सिनेमाचे शूटिंग पाहण्यासाठी हे लोक आले असतील. पण जेव्हा शूटिंगच्या ब्रेकमध्ये तो लोकांच्याकडे गेला तेव्हा त्यांच्याशी बोलताना चकित झाला. लोक त्याला 'कालिन भैय्या' म्हणत होते. आणि कालिन भैय्या आम्हाला पुन्हा कधी दिसणार याची चौकशी करीत होते. युकेमध्येही 'मिर्झापूर' मालिका लोकप्रिय असल्याचे यामुळे पंकज यांच्या लक्षात आले.
पंकज त्रिपाठी म्हणाले, "शूट संपल्यानंतर त्यांना भेटायची संधी मिळाली. तेव्हा ते फक्त एकच प्रश्न विचारत होते. कालिन भैय्या तुम्ही स्क्रिनवर परत कधी येणार?"
त्यांनी पुढे सांगितले, "मोठ्या प्रमाणावर मिर्झापूरचे चाहते पाहून दंग झालो. या सिरीजने ब्रिटनमध्येही आपले स्थान निर्माण केल्याचे पाहून आनंद झाला. जेव्हा मी दुसऱ्या एका प्रोजेक्टचे काम करीत होतो तेव्हा क्रू मेंबर्स आणि सहकारी मला मिर्झापूरबद्दलच विचारत होते."
पुनीत कृष्णा निर्मित आणि गुरमीतसिंग आणि मिहिर देसाई दिग्दर्शित ‘मिर्झापूर’ रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित आहेत.