ETV Bharat / sitara

‘अनपॉझ्ड: नया सफर' मधील ‘गोंद के लड्डू' मध्ये नीना कुलकर्णी शिकताहेत नवीन तंत्रज्ञान! - अभिनेत्री नीना कुलकर्णी

कोरोना काळातील अनुभवांवर आधारित काही शॉर्ट फिल्म्स बनल्या आहेत ज्या अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘अनपॉझ्ड: नया सफर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याच्या अलीकडेच लाँच झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पाच प्रतिभावान दिग्दर्शक अशा कथा घेऊन आले आहेत ज्या प्रेक्षकांना थक्क करून सोडतील.

अभिनेत्री नीना कुलकर्णी
अभिनेत्री नीना कुलकर्णी
author img

By

Published : Jan 19, 2022, 4:38 PM IST

मुंबई - मनुष्याच्या आयुष्यात कोरोनाने भरपूर बदल केले. या महामारीच्या काळात अनेकांना अनेक अनोखे आणि विचित्र अनुभव आले. अशाच काही अनुभवांवर आधारित काही शॉर्ट फिल्म्स बनल्या आहेत ज्या अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘अनपॉझ्ड: नया सफर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याच्या अलीकडेच लाँच झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या अमेझॉन ओरिजिनल्समध्ये पाच हिंदी लघुपट दाखवले जाणार असून, प्रत्येक लघुपट कोरोना महामारीमुळे आलेल्या आव्हानांमध्ये कसे वागावे हे प्रेक्षकांना गुंतवून ठेवत सांगेल. या कथा सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याच्या गरजेवरही भर देतात. पाच प्रतिभावान दिग्दर्शक अशा कथा घेऊन आले आहेत ज्या प्रेक्षकांना थक्क करून सोडतील.

'अनपॉज्ड: नया सफर' अशा पाच अनोख्या कथा आपल्यासाठी घेऊन येत आहे ज्या, आशा, सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याबाबत आहेत. प्रेम, तळमळ, भीती आणि मैत्री यासारख्या मानवी भाव-भावनांचे शब्दचित्र, शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरुण (तीन तिगडा), नुपूर अस्थाना (द कपल), अयप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) यांसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेने जिवंत केले आहे.

अनपॉज्ड: नया सफर
अनपॉज्ड: नया सफर -गोंद के लड्डू

'गोंद के लड्डू' या लघुपटात असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी काम करीत असून त्या म्हणाल्या, "प्रत्येकजण एक छोटीशी आशा शोधत आहे आणि 'अनपॉझ्ड: नया सफर'चे तेच उद्दिष्ट्य आहे. एंथोलॉजीचे पाचही चित्रपट तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतील. 'गोंद के लड्डू' या आमच्या चित्रपटाचे शीर्षक असून यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक या अनिश्चित काळात नवीन तंत्रज्ञानाशी कसे जुळवून घेते, याची ही कथा आहे. ही अगदी साध्या मानवी भावभावनांची कथा आहे, जी आमची दिग्दर्शिका शिखा माकन हिने अतिशय सुंदरपणे मांडली आहे. ही एक अशी कथा आहे जी प्रत्येकजण स्वतःशी रिलेट करेल."

अनपॉज्ड: नया सफर
अनपॉज्ड: नया सफर -गोंद के लड्डू

'अनपॉज्ड: नया सफर' २१ जानेवारी २०२२ पासून प्रेक्षक अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.

हेही वाचा - Vicky Kaushal Enjoy Cricket : जेव्हा सिनेमाच्या सेटवर क्रिकेटसाठी विकी कौशल 'वेळ काढतो' पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.