ETV Bharat / sitara

छोटी सरदारनीमधील निम्रत कौर अहलुवालिया घालवते रिकामा वेळ ‘या’ साथीदारासोबत!

निम्रत कौर अहलुवालिया ही कलर्सच्या छोटी सरदारनीमध्ये मेहेर म्हणून लोकप्रिय आहे. ती तिच्या साथीदाराविषयीचे गुपित उघड करताना ‘नोहा’ चे नाव घेतले. ‘नोहा या माझ्या साथीदारासोबत वेळ घालवणे हा माझा छंद व आनंद आहे. त्याच्यासोबत खेळताना सर्व मानसिक तणावातून मुक्ती मिळते व थकवा दूर होतो.

author img

By

Published : Jan 22, 2021, 7:16 AM IST

निम्रत कौर अहलुवालिया घालवते रिकामा वेळ ‘या’ साथीदारासोबत!

मुंबई - एकटेपणा घालवण्यासाठी अनेकजण प्राणी पाळतात व कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र आहे असं म्हटलं जातं. कुत्रा ही पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे जो स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतो हे सिद्ध झाले आहे. निम्रत कौर अहलुवालिया ही कलर्सच्या छोटी सरदारनीमध्ये मेहेर म्हणून लोकप्रिय आहे. ती तिच्या साथीदाराविषयीचे गुपित उघड करताना ‘नोहा’ चे नाव घेतले. ‘नोहा या माझ्या साथीदारासोबत वेळ घालवणे हा माझा छंद व आनंद आहे. त्याच्यासोबत खेळताना सर्व मानसिक तणावातून मुक्ती मिळते व थकवा दूर होतो. त्याच्यासाठी मी शूटिंग संपल्यावर ताबडतोब घरी येते’, निम्रत कौर अहलुवालियाने सांगितले.

यावर पुढे बोलताना, निम्रत म्हणाली, “माझे आईवडील दिल्लीला राहतात आणि माझ्या कामाच्या जबाबदारीमुळे, मी मुंबईला आले आहे. मी येथे एकटी राहते आणि मला माझ्या कुटुंबाची आठवण येते. यात मला दिलासा फक्त माझ्या पाळीव कुत्र्याकडून मिळतो, जो माझ्यावर विनाअट प्रेम करतो. तो अतिशय खोडकर, प्रेमळ आणि अत्यंत उत्साही बीगल आहे व तो फक्त १ वर्षांचा आहे. नोहा सोबत राहून मी जीवनात धीर धरायला आणि दयाळू व्हायला शिकले आहे. त्याला घरी आणणे हा माझा सर्वात चांगला निर्णय होता आणि आता मी त्याच्या शिवाय राहू शकत नाही. तो माझा तणाव कमी करतो आणि जेव्हा मी कामावरून घरी येते तेव्हा दररोज माझ्यातील उत्साह वाढवतो!”

हेही वाचा - कर्नाटकातील शिमोग्यात जिलेटीनने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, आठ जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.