‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेत शुभ्रा, सुझॅन आणि सोहमला, आणणार वठणीवर! - तेजश्री प्रधान
'झी मराठी'वरील 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या घरातील एक झाली असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे.
मुंबई - ‘अग्गबाई सूनबाई’चे दुसरे पर्वही प्रेक्षकांना भावतेय. पहिल्या पर्वत तेजश्री प्रधान करीत असलेली ‘सूनबाई’ आता अभिनेत्री उमा पेंढारकर साकारतेय. तिलाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय. खरंतर 'झी मराठी'वरील 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या घरातील एक झाली असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे.
मालिकेत बबड्या म्हणजेच सोहम आपली पत्नी शुभ्रावर सतत नाराज असतो. परंतु तिचे सासरे अभिजित राजे मात्र नेहमी तिच्या बाजूने उभे राहतात. (पहिल्या पर्वत शुभ्रा आपली सासू आसावरीच्या मागे ठामपणे उभी राहायची). सोहम शुभ्राचा पाणउतारा करण्यात धन्यता मानतो आणि आपल्या आईसमोर साळसूदपणाचा आव आणतो. आता त्याच्या टीममध्ये सुझॅनची पण भर पडलीय आणि ते दोघेही मिळून शुभ्राला जास्तीतजास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
बुजरेपणा सोडून दिलेल्या शुभ्राने सोहमला सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे पण शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन प्रयत्न करतेय. सोहमच्या घरी येऊन शुभ्राला घराच्या बाहेर घालवून त्या घरावर राज्य करण्याची स्वप्न सुझॅन पाहतेय. पण शुभ्रा देखील तिची खोड मोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सुझॅनला जर हे घर आपलंस करायचं असेल तर या घरातील सुनेची सर्व कामं देखील करावी लागतील असं म्हणून शुभ्रा तिला कामाला जुंपते आणि तिच्याकडून घरची सर्व कामं करून घेते. या सगळ्यानंतर आता सुझॅनची अक्कल ठिकाणावर येणार की ती पुन्हा शुभ्राला त्रास देण्यासाठी काही नवीन प्लानिंग करणार हे पाहणे मनोरंजक असेल.
ही मालिका आता उत्कंष्ठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत प्रेक्षकांनी अनुराग म्हणजेच अभिनेता चिन्मय उदगीरकरची एंट्री पाहिली. आधी या मालिकेत शुभ्राचे वेगळे रूप प्रेक्षकांनी पाहिले. आधी शुभ्रा थोडी बुजरी होती. सतत बबडूच्या काळजीत असलेली शुभ्रा 'मी करते ते बरोबर की नाही' हा भाव तिच्या मनात असायचा. बबडूची जबाबदारी असल्याने ती घरातच होती पण शुभ्राचा आत्मविश्वास आता परत आला असून तिने डीबीके फूड्स जॉईन केलं आहे. या सगळ्यात शुभ्रा सुझॅन आणि सोहमला कसं वठणीवर आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
‘अग्गबाई सूनबाई’ ही मालिका सोम.- शनी. रा. ८.३० वा. झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.