ETV Bharat / sitara

एक गूढ रहस्यमय मालिका 'ती परत आलीये'! - Mystery series 'Ti Parat Aaliye

'देवमाणूस' या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी आता झी मराठीवर एक नवीन मालिका येऊ घातलीय 'ती परत आलीये' नावाची.

New series Ti Parat Aaliye' on Zee Marathi
मालिका 'ती परत आलीये'!
author img

By

Published : Jul 20, 2021, 10:24 PM IST

सध्या मनोरंजनसृष्टी रुळावर येताना दिसतेय. निरनिराळ्या वाहिन्यांवर नवनवीन वाहिन्या सुरु होताना दिसताहेत. झी मराठी या वाहिनीवरील मालिकांना नेहमीच आवडीने पाहिले जाते, त्यातच नवीन मालिका असेल तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढलेली असते. झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी आता झी मराठीवर एक नवीन मालिका येऊ घातलीय 'ती परत आलीये' नावाची.

नवीन मालिका 'ती परत आलीये’ एक गूढ रहस्यमय मालिका असून या मालिकेचं लेखन 'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंकाच नाही. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं की विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे आणि या मालिकेत अजून कोण कोण कलाकार असणार आहेत ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "एका रहस्यमय मालिकेत काम करताना मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे हे सगळ्यांना लवकरच कळेल. या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतील. प्रेक्षक या भूमिकेवर प्रेम करतील अशी माझी खात्री आहे."

हेही वाचा - Viral video: कपीलचा राज कुंद्राला प्रश्न, ''बिन काही करता पैसे कसे कमवता?''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.