अभिनेत्री नेहा पेंडसे हिने ५ जानेवारीला शार्दुल बायस यांच्यासोबत विवाहगाठ बांधली. शार्दुल हे उद्येगपती असून त्यांचा यापूर्वी दोनदा घटस्फोट झालाय. त्यांना दोन मुलेही आहेत. अशा व्यक्तीसेबत नेहाने विवाह केल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. नेहा गप्प बसेल तर कसली...तिनेही ट्रोलर्सना सडेतोड उत्तरे देत मुकाबला केलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एका नामांकित वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. उद्योगपतीसोबत नेहाने केवळ पैशासाठी लग्न केल्याचा आरोप ट्रोलर्सनी केला होता. विवाह मोडणे ही काही आजच्या काळात नवीन गोष्ट नाही. पतीचा दोनदा घटस्फोट झालाय हे खरे आहे. करियरच्या नादात त्याला संसार सांभाळता आला नाही. त्याने दोनदा संसार मोडल्यानंतर माझ्याशी लग्न केलंय. असे लग्न करायलाही हिंमत लागते. मीदेखील काही व्हर्जीन नाही. आम्ही दोघांनीही गतकाळ विसरुन एकमेकांचा स्वीकार केलाय. असे रोखठोक उत्तर नेहाने दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शार्दूलची दोन्ही लग्नं मोडली असली तरी तो प्रेमळ व्यक्ती आहे. त्याचे मुलांवर जीवापाड प्रेम आहे.. शार्दूलला भेटण्याआधी माझीही दोन तीन प्रेम प्रकरणे झाली. मात्र हे नाते टिकू शकले नाही. त्यानंतर माझी शार्दूल याच्यासोबत ओळख झाली. त्याच्या पूर्वआयुष्याबद्दल मला सर्व माहिती आहे. मी त्याच्यासोबत विवाह केलाय याचा मला आनंद असल्याचेही नेहाने सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नेहा पेंडसेने हिंदी मराठी टीव्ही मालिका, रियॅलिटी शो, बिग बॉस,मराठी चित्रपट याच्यात अभिनय केलाय. ती बिनधास्त दिसण्या, वागण्या आणि बोलण्याबद्दल प्रसिध्द आहे.