ETV Bharat / sitara

नम्रता शिरोडकरने शेअर केला घरातील जादूचा व्हीडिओ - नम्रता शिरोडकर

नम्रता शिरोडकरने आपल्या घरातील एक जादूचा व्हीडिओ शेअर केलाय. धुरकट फिल्टर असलेला हा व्हीडिओ गूढ असून यात तिची मुलगी सितारा दिसत आहे.

Namrata Shirodkar shares 'conjuring in the house'
नम्रता शिरोडकरने शेअर केला घरातील जादुचा गुढ व्हिडिओ
author img

By

Published : Jun 12, 2020, 2:17 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आणि बॉलिवूडची एकेकाळची स्टार अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने तिच्या घरात जादू घडतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नम्रताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये तिच्या घराभोवती तिची मुलगी सितारा चेहऱ्यावर केसांनी चेहरा झाकून फिरताना दिसते.

या व्हीडिओला धुरकट फिल्टर आणि मंद संगीत देऊन भीतीदायक इफेक्ट साधण्याचा प्रयत्न नम्रताने कला आहे. याला कॅप्शनही गूढ देण्याचा प्रयत्न तिने केलाय.

हीरो हिंदुस्थानी, वास्तव: द रिअॅलिटी अॅण्ड प्रेज्युडिस यासारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे नम्रता बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. नम्रताने 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील बॉम डिग्गीच्या तालावर नृत्य करत असतानाचा लाडक्या लेकीचा म्हणजेच सिताराचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.

नम्रता आणि महेश बाबू यांची भेट एका सेटवर २०००मध्ये झाली होती. त्यानंतर प्रेमात पडलेल्या या दोघांनी २००५मध्ये विवाह केला. त्यांना २००६मध्ये गौतम कृष्णा गाट्टामानेनी हा मुलगा आणि २०१२ मध्ये जन्मलेली सितारा ही मुलगी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.