ETV Bharat / sitara

मी आणि माझा नवरा समीर जन्मतः हिंदू, क्रांती रेडकरचे नवाब मलिकांना प्रत्यूत्तर

author img

By

Published : Oct 25, 2021, 6:25 PM IST

Updated : Oct 25, 2021, 7:14 PM IST

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना समीर यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर आपण व समीर दोघेही जन्मतः हिंदू असल्याचा खुलासा केलाय. क्रांतीने ट्विटवर आपले दोन विवाहाचे फोटो शेअर केलाय. एका फोटोत ती व समीर लग्नानंतर हार प्रदान करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ती विवाहानंतर आपल्या आई वडिलांसोबत व इतर नातेवाईकांसोबत दिसत आहे.

समीर वानखेडेंचा क्रांती रेडकरसोबत विवाह
समीर वानखेडेंचा क्रांती रेडकरसोबत विवाहसमीर वानखेडेंचा क्रांती रेडकरसोबत विवाह

समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लीम असा नवा मीडियामध्ये रंगताना दिसत आहे. समीर वानखेडे यांनी ही गोष्ट मान्य केली आहे की त्यांचे वडील हिंदू होते आणि आई मस्लीम होत्या. आपले पहिले लग्न मुस्लीम असलेल्या डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत झाले होते. 2016 मध्ये परस्पर संमतीने त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांनंतर त्यांनी क्रांती रेडकर यांच्याशी विवाह केला होता. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना समीर यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर आपण व समीर दोघेही जन्मतः हिंदू असल्याचा खुलासा केलाय.

क्रांती यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय, '' मी आणि माझा नवरा समीर दोघेही जन्मतः हिंदू आहोत. आम्ही कोणतेही धर्मांतर केलेले नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू होते आणि माझ्या मुस्लीम असलेल्या सासूंशी विवाह केला होता, ज्या आता हयात नाहीत. समीरचे अगोदरचा विवाह विशेष विवाह कायद्यानुसार झाला होता आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमचा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार झालाय.''

  • Me n my Husband Sameer r born Hindus.We hv never converted to any other religion.V respect all religions.Sameer’s father too is hindu married to my Muslim Mom in law who is no more.Sameer’s ex-marriage ws under special marriage act,divorced in 2016.Ours in hindu marriage act 2017 pic.twitter.com/BDQsyuvuI7

    — Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) October 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रांतीने ट्विटवर आपले दोन विवाहाचे फोटो शेअर केलाय. एका फोटोत ती व समीर लग्नानंतर हार प्रदान करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ती विवाहानंतर आपल्या आई वडिलांसोबत व इतर नातेवाईकांसोबत दिसत आहे.

समीर वानखेडेंचा क्रांती रेडकरसोबत झाला होता दुसरा विवाह

क्रांती रेडकर यांचा समीर वानखेडे यांच्यासोबत 2017 मध्ये हिंदू रिवाजानुसार विवाह झाला होता. त्यापूर्वी वानखेडे यांचा पहिला विवाह 12 डिसेंबर 2006 रोजी डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत झाला होता. समीर आणि शबाना यांना दोन मुली आहेत. त्यांचा घटस्फोट 2016 मध्ये झाल्यानंतर क्रांतीसोबत 2017 मध्ये समीर यांनी विवाह केला.

समीर वानखेडे मुस्लीम आहेत का? हा वाद नेमका काय आहे?

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंचा फोटो ट्वीट करत “पैचान कौन?” इतकंच लिहित वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एकट्याचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर समीर वानखेडे हे दलीत असून त्यांना लक्ष्य केले जात असल्याची टीका मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. त्यानंतर समीर हे दलीत नसून मुस्लीम असल्याचा खळबळजनक खुलासा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यासाठी त्यांनी समीर यांच्या जन्माचे प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यानंतर समीर यांनी हे गोष्ट फेटाळली होती.

हेही वाचा - दिल्लीतील NCB चे वरिष्ठ अधिकारी उद्या मुंबईत; समीर वानखेडेंवरील आरोपांची करणार चौकशी

Last Updated : Oct 25, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.