मुंबई - टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने 27 जानेवारी (गुरुवार) दीर्घकाळचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सात फेरे घेतले. मौनीने दुबईत नाही तर गोव्यात लग्न केले आहे. मौनीच्या लग्नाच्या मंडपातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूरज हा दुबईमधला बिझनेसमन आहे आणि २०१९ च्या न्यू इयर पार्टीमध्ये मौनी पहिल्यांदा त्याला भेटली होती.

लग्नात मौनी रॉय खूपच सुंदर दिसत आहे. कोरोना विषाणूमुळे लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रच उपस्थित होते. मौनीने दक्षिण भारतीय आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले आहे.

मौनी रॉयचा वेडिंग लूक
मौनी रॉयने सूरज नांबियारला दक्षिण भारतीय शैलीत आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये मौनी रॉय आणि सूरज नांबियार पॅव्हेलियनमध्ये दिसत आहेत.

एका फोटोमध्ये सूरज मौनीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तर एका व्हिडिओमध्ये ते माला अर्पण करतानाचे क्षण टिपले आहेत. यात एक फोटो खूप खास आहे कारण हे जोडपे पॅव्हेलियनमध्ये एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - अॅक्शन स्टार प्रभूदेवाच्या 'रकेला' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज