ETV Bharat / sitara

‘मोलक्की’ ची प्रियल महाजन वापरते फक्त, सेंद्रिय सौंदर्य प्रसाधने! - मोलक्की प्रियल महाजन न्यूज

'पूर्वी' साकारणारी प्रियल महाजनला वास्तविक जीवनात मेकअपची खूप आवड आहे. त्वचेचे लाड करायला या अभिनेत्रीला आवडते आणि ती म्हणाली ती नेहमीच काही घरगुती उपाय तिच्या त्वचेच्या नियमित देखभालीसाठी करत असते.

मोलक्की प्रियल महाजन न्यूज
मोलक्की प्रियल महाजन न्यूज
author img

By

Published : Jan 20, 2021, 7:45 PM IST

मुंबई - ‘विकत घेतलेली भार्या’, किंवा ‘मोल देऊन आणलेली पत्नी’, ही प्रथा भारतातील बऱ्याच प्रांतात अजूनही दिसून येते जिला ‘मोलक्की’ म्हटले जाते. या प्रथेला छेद देण्यासाठी बालाजी टेलिफिल्म्स ने एक नवीन शो प्रस्तुत केलाय तो म्हणजे ‘मोलक्की’. कलर्सचा शो ‘मोलक्की’, मध्ये नामवंत कलाकार अमर उपाध्याय विरेंद्र प्रताप सिंगच्या भूमिकेत आणि प्रियल महाजन पूर्वी च्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

मोलक्की प्रियल महाजन न्यूज
मोलक्की - प्रियल महाजन
सध्या चालू असलेल्या शोच्या ट्रॅकमध्ये, पूर्वी तिच्या नव्या कुटुंबात तडजोड करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि तिच्या मार्गात येणारी आव्हाने स्विकारत आहे. ती तिचा सावत्र भाऊ वैभव प्रताप सिंगशी लढते आणि त्याचे दुष्ट हेतू थांबवते. पूर्वी च्या नव्याने गवसलेल्या ताकदीवर आणि आव्हानात्मक परिस्थिती ती ज्या प्रकारे हाताळते त्यावर प्रेक्षक फिदा आहेत.

हेही वाचा - ‘बॅरिस्टर बाबू’ च्या सेटवरील जिवाभावाच्या मैत्रिणी, चाहत तेवानी आणि औरा भटनागर

'पूर्वी' साकारणारी प्रियल महाजनला वास्तविक जीवनात मेकअपची खूप आवड आहे. त्वचेचे लाड करायला या अभिनेत्रीला आवडते आणि ती म्हणाली ती नेहमीच काही घरगुती उपाय तिच्या त्वचेच्या नियमित देखभालीसाठी करत असते.

मोलक्की प्रियल महाजन न्यूज
मोलक्की - प्रियल महाजन
यावर बोलताना, प्रियल म्हणाली, “एक अभिनेत्री असल्यामुळे मला १२ तासांपेक्षा जास्त वेळ भरपूर मेकअप ठेवावा लागतो. शक्यतो मी सेंद्रिय सौंदर्य प्रसाधनेच वापरते. त्वचेवर अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने वापरल्यानंतर आता मी त्वचेला हायड्रेट करण्यासाठी काही घरगुती उपाय वापरते. माझी त्वचा उजळविण्यासाठी मी दूध, मध, हळद इ. असलेला फेस पॅक वापरते. माझा विश्वास आहे की घरगुती उपायांनी तुमची त्वचा जास्त चमकदार बनते व नेहमीच ताजीतवानी राहते. हा उपाय मला माझ्या आईने शिकवला आहे. तो सोपा, प्रभावी आणि नैसर्गिक आहे आणि त्वचेच्या नियमित जैविक देखभालीसाठी कोणालाही हा उपाय वापरण्याचा शिफारस मी करेन!”

हेही वाचा - ईश्वराची कोणतीही निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध होत नसल्याचा संदेश देणारा' ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.