ETV Bharat / sitara

''हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता''...तारक मेहता विरुद्ध मनसे आक्रमक - सब वाहिनीवर 'तारका मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी

तारका मेहता का उल्टा चष्मा ही विनोदी मालिका यातील संवादामुळे वादाचा विषय ठरली आहे. मुंबईची भाषा मराठी नाही तर हिंदी असल्याचे ठासवण्याचा प्रयत्न मालिकेतून झाल्यामुळे मनसेसह मराठी भाषिक संतापले आहेत.

MNS threat Tarak Mehata serial
तारक मेहता विरुध्द मनसे आक्रमक
author img

By

Published : Mar 3, 2020, 5:21 PM IST

Updated : Mar 3, 2020, 6:22 PM IST

मुंबई - सब वाहिनीवर 'तारका मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी मालिका खूप लोकप्रिय आहे. या मालिकेतील एका प्रसंगात मुंबईची भाषा हिंदी असल्याचे विधान आहे. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मालिकेतील प्रसंगात सुविचार लिहिण्याची चर्चा आहे. गोकुळधाम ही सोसायटीतील रहिवासी यावर चर्चा करत आहेत. सुविचार कोणत्या भाषेत असावा यावर चर्चा सुरू असताना एक पात्र म्हणते, आपली सोसायटी मुंबईत आहे आणि इथली भाषा हिंदी आहे. त्यामुळे सुविचार हिंदीत असायला पाहिजे. जर आपली सोसायटी चेन्नईत असती तर आम्ही सुविचार तामिळमध्ये लिहिला असता. जर आपले गोकुळधाम अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये असते तर आपण सुविचार इंग्लिशमध्ये लिहिला असता. या संवादानंतर सीनमधील सर्व पात्रे होकार देतात.

तारका मेहतामधील हा प्रसंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खटकला आहे. चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया देताना लिहिलंय,

''हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता ...

मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरू असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते.''

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी संघटनेच्यावतीने एक परिपत्रक प्रसिध्द करण्यात आलंय. तारक मेहता मालिकेचे निर्माता असित मोदी, दिग्दर्शक हर्षद जोशी आणि लेखक निरेन भट यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रकात, मुंबई नाही कुणाच्या बापाची, मुंबई फक्त मराठी माणसाची असल्याचे म्हटले आहे. मालिकेतील वादग्रस्त संवादाबद्दल मराठी जनतेची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.

  • मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!
    'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर वाचता येतील!! @sabtv pic.twitter.com/tuydzv0kEW

    — Shalini Thackeray (@ThakareShalini) March 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी लिहिलंय, ''मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!

'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर वाचता येतील!!''

सब टीव्ही वरील या मालिकेच्या विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेने याविरुद्ध आवाज उठवला असून सब वाहिनी आणि तारक मेहताच्या टीमला तातडीने याबाबत निवेदन करावे लागणार आहे.

Last Updated : Mar 3, 2020, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.