मुंबई - कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. याचा मुकाबला एकत्र आल्या आहेत. यामध्ये भारताची मानुषी छिल्लर (मिस वर्ल्ड 2017), प्यूर्टो रिको येथील स्टेफनी डेल वॅले, (मिस वर्ल्ड 2016) आणि मेक्सिको येथील वॅनेसा पोन्स (मिस वर्ल्ड 2018) यांचा समावेश आहे.
याबद्दल बोलताना मानुषी म्हणाली, "अशा प्रसंगी, आपल्यातील देशांमध्ये आणि समुदायांमध्ये कोव्हिड -१९ बद्दल अधिक जागरूकता वाढविण्याचे काम प्रत्येक जण करु शकतो. व्हायरसचा ट्रॅक थांबविण्याची ही गुरुकिल्ली असेल. मला लोकांना सांगायचे आहे की, आम्ही एकत्र आहोत आणि भारतात जे घडत आहे ते उर्वरित जगातही घडत आहे. "
आज इंस्टाग्रामवर सुरू असलेल्या संगीतादरम्यान या तीन सुंदरी एकत्र असतील. तिघीही सामाजिक प्रशानंबद्दल बोलत आहेत आणि शिक्षणाविषयी, मासिक पाळी, स्वच्छता, भेदभाव, जातीयवाद इत्यादी संदर्भात त्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.
साथीच्या रोगाबद्दल बोलचताना मानुषी म्हणते, ''ज्या संकटात आपण भारत पाहात आहोत तशीच अवस्था संपूर्ण जगाची आहे. मी आणि माझी मेक्सिकन आणि प्यूर्टो रिको येथील मैत्रीणी मिळून यावर भाष्य करू. आम्ही एक जग आहोत आणि सामुदायिकपणे लढू शकतो, ठिक होऊ शकतो. त्या दिशेने आमचे प्रयत्न आहेत.''