मुंबई - अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्माला असे वाटते की मिर्झापूर या वेब सिरीजमुळे तिची गोड मुलीची प्रतिमा बिघडली आहे. ती म्हणाली, ''मिर्झापूर करण्याचे मुख्य कारण म्हणजे मला एक प्रेमळ हिरॉईनपेक्षा जास्त विश्वासार्ह कलाकार बनायचे होते. कथेचे जग आणि व्यक्तीरेखा यामुळे मी या शोकडे आकर्षित झाले. ' 'हरामखोर'मध्ये एका गोंडस मुलीची भूमिका साकारल्यानंतर मी या वेब सिरीजची निवड केली. कलाकाराला सर्व प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. मी कोमल भूमिकेत दिसणार नाही अशा कथा आणि चित्रपटांची जाणीवपूर्वक निवड केली. "
'मिर्झापूर' च्या पहिल्या सिझनमध्ये ती गोलू गुप्ताच्या भूमिकेत दिसली होती. आता दुसऱ्या भागात एक अतिशय कणखर आणि करारी भूमिकेत झळकणार आहे.
श्वेता म्हणाली, "'लाखों में एक'चा दुसरा सिझन आणि मिर्झापूर या दोन्हींमुळे मी किती बदलले हे माझ्या लक्षात आले. हे दोन्हीही शो नेगळे होते आणि माझ्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा यात हायलाईट होत होत्या. एक नीतिमान होती, तर दुसरी सकारात्मक होती. या वेगळ्या स्तरांनी यमाझ्या भूमिका मनोरंजक बनल्या आणि मला काम केल्याचा आनंद मिळाला. आता मला खूपच अष्टपैलू आणि रुचीपूर्ण भूमिका मिळत आहेत. "
पुनीत कृष्णा निर्मित आणि गुरमीतसिंग आणि मिहिर देसाई दिग्दर्शित 'मिर्झापूर सीझन 2' 23 ऑक्टोबरपासून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल.