दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने अख्ख्या भारताला ‘पुष्पा’ मध्ये गुरफटून टाकलाय. त्यांची चाल, नाच आणि अंदाज अनेकजण कॉपी करताना दिसताहेत आणि ‘पुष्पा’ चे अनेक मिम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. अगदी राजकारणी लोकंदेखील ‘पुष्पा’मय झाल्यासारखी वाटताहेत. मनोरंजनसृष्टीतील कलाकारसुद्धा या ‘पुष्पा’ लाटेपासून वाचले नाहीयेत. अनेक कलाकार ‘पुष्पा’ च्या डायलॉग्स चे मिम्स सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसताहेत. यात आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदे ला ५०% ‘क्रेडिट’ जायला हवं कारण अल्लू अर्जुन चे ‘पुष्पा’ च्या हिंदी आवृत्तीतील संवाद त्यानेच डब केले आहेत.
सध्या पुष्पा या चित्रपटाची हवा संपूर्ण देशात पसरली आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाद हे सगळ्यांच्या ओठावर रुळले आहेत. याच चित्रपटातील एका डायलॉगवर सध्या खूप मिम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका देवमाणूस मधील अजितकुमार देव या व्यक्तिरेखेलासुद्धा पुष्पा प्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यामुळे पुष्पाच्या डायलॉग्सवर देवमाणसाचे मिम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पुष्पाच्या अंदाजमधील डायलॉग अजितकुमार काहीसा असा म्हणतो - "देवमाणूस नाम सूनके भगवान समझा क्या? भगवान नाही दानव है में" या मिमवर नेटिझन्स आपल्या कमेंट्समधून भरभरून प्रतिसाद देत आहेत. चाहते प्रेक्षक या मिमचा आनंद घेत आहेत पण देवमाणूसची प्रमुख भूमिका निभावणार अभिनेता किरण गायकवाड याला देखील हा मिम इतका आवडला कि त्याने देखील आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी तो शेअर केला आहे.
हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'तील नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज