ETV Bharat / sitara

H2O चा ट्रेलर प्रदर्शित, केतकीच्या आवाजाला 'या' गायकाने दिली साथ

H2O चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बऱ्यात नव्या कलाकारांची झलक पाहायला मिळते. 'थेंबाची कहाणी' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामधून पाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

author img

By

Published : Mar 30, 2019, 10:15 PM IST

H2O चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - मराठी सिनेसृष्टीत आता अनेक नवनविण प्रयोग व्हायला लागले आहेत. नवोदित कलाकारांनाही संधी देण्यात येत आहे. अशाच नवोदित कलाकारांना घेऊन जीएस प्रोडक्शन अंतर्गत H2O चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

H2O चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बऱ्यात नव्या कलाकारांची झलक पाहायला मिळते. 'थेंबाची कहाणी' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामधून पाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये शिक्षणासाठी शहरात राहणारे युवक गावात येऊन पाण्याचं महत्व पटवून देताना दिसतात. गावकऱ्यांच्या सहकार्याने पाण्याच्या बचतीसाठी प्रयत्न करतात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटात प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या आवाजातील गाणंही पाहायला मिळणार आहे. तसेच, रोहित राऊत आणि केतकी माटेगावकर यांच्याही आवाजाचा स्वरसाज गाण्याला लाभला आहे. १२ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

bollywood news 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.