मुंबई - जगभरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता नागरिकांमध्ये कोरोनाशी लढण्याविषयीची जनजागृती करण्यासाठी बरेच सेलिब्रिटी एकवटले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आता मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही एक व्हिडिओ तयार करुन नागरिकांना कोरोनाशी लढण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
स्वप्नील जोशी, सुबोध भावे, भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, तेजस्वीनी पंडीत, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, भरत जाधव, रवी जाधव, जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, अभिजीत खांडकेकर आणि सचिन पिळगावकर यांनी या व्हिडिओतून नागरिकांना खास संदेश दिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -GO CORONA : बॉलिवूड कलाकारांनीही केला टाळ्या, थाळ्यासह घंटानाद
अभिनेता अमेय वाघ अलिकडेच विदेशातून भारतात परतला आहे. त्याच्या हातावर होम कॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे तो देखील पुढचे काही दिवस घराबाहेर पडणार नाही. तसेच नागरिकांनी देखील गर्दीच्या ठिकाणी न जाता घरातच राहावे, असा संदेश अमेयने या व्हिडिओतून दिला आहे.
सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता, कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही या सर्व कलाकारांनी केले आहे.
हेही वाचा -कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी किंग खानने वापरला हटके फंडा, पाहा व्हिडिओ