ETV Bharat / sitara

दहशतवादाला धर्म नसतो, पण पकडलेला दहशतवादी मुस्लीम असतो - शरद पोंक्षे - marathi actor

कमल हसन यांनी गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. अशात आता मराठी अभिनेता शरद पोक्षेंनीही कमल हसन यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदूं सहिष्णूवादी आहेत म्हणूनच असलं वक्तव्य खपवून घेतलं जात असं पोंक्षेंनी म्हटलं आहे.

कमल हसनच्या वक्तव्यावर शरद पोक्षेंची प्रतिक्रिया
author img

By

Published : May 15, 2019, 1:34 PM IST

मुंबई - अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून हसन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशात आता मराठी कलाकारांनीही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं विधान हसन यांनी केलं होतं.

आता यावर मराठमोळा अभिनेता शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया आली आहे. दहशतवादाला धर्म नसतो, अगदीच मान्य पण, पकडलेला दहशतवादी हा मुस्लीम असतो, हे जगातलं वास्तव आहे. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णू आहे. इतिहास साक्ष आहे, की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत.

आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित आणि सुखी कुठे रहात असतील तर ते हिंदुस्तानात आहेत आणि हे कित्येक मुसलमानांच मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी, असा उल्लेख करतोय तेही जाहिरपणे आणि आपण ते खपवून घेतो, हाच हिंदूंचा सहिष्णूपणा, अशी पोस्ट करत त्यांनी कमल हसन यांच्यावर निशाणा साधला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.