पुणे - कोरोनाच्या गेल्या दीड वर्षात ओटिटी प्लॅटफॉर्मवर अनेक मराठी वेबसीरिज सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या वेब सीरीज आणि सिनेमा प्रदर्शित होत असताना अनेक नवोदित कलाकार यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. या नवोदित कलाकारांनी आपापल्या भूमिका योग्य रितीने पार पडल्या असल्या तरी कला सादर करताना आपली मेहनत, आपला प्रयास सातत्याने सुरू ठेवावा, असे आवाहन मकरंद अनासपुरे यांनी नवोदित कलाकारांना आवाहन केले.
मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांएवढे मानधन मिळत नसल्यामुळे या वेळी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत मराठी कलाकारांवर अतिशय बिकट परिस्थिती आली होती. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी सज्ज राहावे आणि आपल्या कलागुणांचा सराव करत राहावा. कुठेही डिप्रेशनमध्ये न जाता, हास्य हे सगळ यावरच जालीम औषध आहे. त्यामुळे नेहमी हसत राहा, असे त्यांनी सांगितले. नाम फाउंडेशनच्या वतीने मकरंद अनासपुरे यांनी अनेक कोकण पूरग्रस्त वासियांना मदत केली तसेच कोरोना काळात अतिशय दुर्गम भागात त्यांनी अनेक गावांना शिधावाटप व लसीकरण यावर भर दिला आणि काम केले.
यावेळी त्यांनी आपल्या प्रेक्षक वर्गाला देखील दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनचा 48 वा वाढदिवस