‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी प्रहसनांचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका झालेला आहे. यातील विनोदवीरांनी आणि विनोदवीरांगनांनी मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमात अनेक पाहुणे कलाकारही आपले विनोदी अंग पेश करताना दिसतात. या आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठठं नावं या महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. महेश मांजरेकर या कार्यक्रमात नुसती हजेरी लावणार नसून एका प्रहसनाचा भागही असणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचा समावेश आहे. प्रेक्षकांसाठी ही लाफ्टर थेरपीच बनली आहे. मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावताहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘पांघरूण’ या चित्रपटाची टीम हास्यजत्रेच्या मंचावर आली होती. यानिमित्ताने चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अमोल बावडेकर ही मंडळी इथे उपस्थित होती. हास्यजत्रेतील स्कीटमध्ये महेश मांजरेकर स्वतः सहभागी झाले. "मी न चुकता हास्यजत्रेचे सर्व भाग पाहतो आणि मला हा कार्यक्रम खूप आवडतो," असं ते म्हणाले. त्यांना हास्यजत्रेच्या मंचावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये महेश मांजरेकरांच्या परफॉर्मन्स आणि इतर स्किट्स येत्या ११ आणि १२ फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा - दीपिका पदुकोण आणि माझ्यात नाते बहिणींसारखे : अनन्या पांडे!