ETV Bharat / sitara

महाराष्ट्रीयन पद्मिनी कोल्हापुरेने ‘मराठी मुलगी’ सायलीला दिली स्वतःची नथ! - इंडियन आयडॉल १२ सुरु

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेला इंडियन आयडॉलची स्पर्धक सायलीचे गाणे प्रचंड आवडले. पद्मिनीने तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिला आशीर्वाद म्हणून तिने मराठमोळी नथ आणि बिंदीही भेट म्हणून दिली.

Indian Idol 12 starts
इंडियन आयडॉल १२
author img

By

Published : Feb 4, 2021, 2:08 PM IST

मुंबई - इंडियन आयडॉल १२ सुरु झाल्यापासून त्यातील स्पर्धक उत्तमोत्तम गाणी अप्रतिमपणे सादर करून रसिकांची मने जिंकताहेत. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी निमंत्रणावरून हजेरी लावतात. येत्या भागात बॉलिवूडमधील सख्या बहिणींसारख्या दोन घट्ट मैत्रिणी, पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम धिल्लन पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.

संगीत क्षेत्राला ज्या कार्यक्रमाने अनेक गायक दिले आहेत, तो कार्यक्रम देशासाठी आणखी एक ‘आयडॉल’ देण्यासाठी सज्ज आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा सर्व नवोदित गायकांसाठीचा प्लॅटफॉर्म असून तेथे ते त्यांच्या प्रतिभेचे सादरीकरण करून देशवासीयांची शाबासकी मिळवू शकतात. गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनमी धिल्लन या यंदाच्या विकेंड एपिसोडच्या पाहुण्या होत्या. त्यामुळे हा भाग अतिशय संस्मरणीय ठरला.

Indian Idol 12 starts
पद्मिनी कोल्हापुरेने ‘मराठी मुलगी’ सायलीला दिली स्वतःची नथ
अवघ्या देशवासियांची मनं जिकणारी, गोड आवाजाची मराठी मुलगी सायलीने सुमधूर आवाजात ‘प्यार किया नही जाता’ आणि ‘ये वादा रहा’ ही गाणी गायली. यामध्ये तिला नवा चाहता गवसला. चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण युगातील बहारदार अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेला सायलीचे गाणे प्रचंड आवडल्याचे सांगितले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिला आशीर्वाद म्हणून त्यांनी मराठमोळी नथ आणि बिंदीही भेट म्हणून दिली. पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “मला तुझा परफॉर्मन्स आणि आवाज खूप आवाडला. तुझी स्माइलही छान आहे. मी तुला भेट म्हणून देत असलेल्या नथीला माझ्या मनात विशेष महत्त्व आहे. मी तिची जशी काळजी घेत होते, तशीच तू घेशील, असा मला विश्वास आहे.”सायलीचे परीक्षकांनीही कौतुक केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हिमेश रेशमिया म्हणाले, ‘तुझी सुरांवरील पकड घट्ट आहे’. सायली तिची प्रतिक्रिया देताना म्हणाली, ‘एवढ्या महान व्यक्तींसमोर गाणे गाण्याची संधी इंडियन आयडॉलमुळे मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. पद्मिनी मॅमकडून हे विशेष गिफ्ट मिळणे म्हणजे एखादा आशीर्वाद मिळाल्यासारखेच आहे. माझ्यावर तसेच माझ्या गाण्यावर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही मी निराश करणार नाही.” महाराष्ट्रीयन पद्मिनी कोल्हापुरेने ‘मराठी मुलगी’ सायली ला दिलेली नथ ती आयुष्यभर सांभाळून ठेवणार आहे. संगीत रियालिटी शो, इंडियन आयडॉल सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

हेही वाचा - अभिनेत्री रश्मीका मंदनाचा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.