ETV Bharat / sitara

‘लॉ ऑफ लव्ह’ मधून गुलाबी दुलईत पांघरलेल्या प्रेमापेक्षा वेगळ्या पद्धतीचं दिसणार प्रेम !

'लॉ ऑफ लव्ह’ हा सिनेमा प्रेमकथेपेक्षा प्रेमाचा एक वेगळाच पैलू दाखविणारा आहे. गुलाबी दुलईत पांघरलेल्या प्रेमापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीचं प्रेम आणि त्याची परिभाषा सांगणारा हा सिनेमा आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडतील असे एलिमेंट्स या चित्रपटात आहेत.

author img

By

Published : Feb 14, 2021, 12:57 PM IST

‘लॉ ऑफ लव्ह’
‘लॉ ऑफ लव्ह’

मुंबई - पाश्चिमात्य देशातील प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा व्हॅलेंटाईन डे आपल्या देशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे म्हणजे नात्यातील नवेपणा जपणारा दिवस असतो असे ‘लॉ ऑफ लव्ह’ या मराठी चित्रपटाचे निर्माते, कथा-पटकथाकार आणि नायक जे उदय यांचे म्हणणे आहे. खरंतर या चित्रपटाची निर्मितीपूर्व काम सुरु असताना मुख्य कलाकारांच्या निवडीसाठी ऑडिशन्स सुरु होत्या परंतु जे उदय यांच्या ‘चॉकलेट-बॉय’ लूक्समुळे त्यांनीच प्रमुख भूमिका करावी असा आग्रह चित्रपटाची टीम करत होती. सुरुवातीला त्यांनी ते मनावर घेतले नाही परंतु त्यांच्या स्वतःच्या ऑडिशननंतर ते कन्व्हिन्स झाले की ते या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेला न्याय देऊ शकतील. तसंही जे उदय यांना रोमँटिक फिल्म्स आवडतात व त्याचा फायदा त्यांना ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या नायकाची भूमिका साकारताना झाला. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यांनाही उत्सुकता आहे की प्रेक्षक त्यांना कसे स्विकारतात.

‘लॉ ऑफ लव्ह’ या चित्रपटातून अजून एक नवीन चेहरा पदार्पण करतोय, शाल्वी शाह. तिची आणि जे उदय यांची केमिस्ट्री जमून आलीय व ते या चित्रपटातून प्रेमाची नवी व्याख्या सादर करताना दिसतील. जे उदय व्हॅलेंटाईन डे आणि चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ बद्दल आपले मत व्यक्त करताना म्हणाले, ‘माझ्या मते प्रेमाला कोणतीही चौकट असू शकत नाही. व्हॅलेंटाईन डे म्हणजे बदललेला ट्रेंड आहे ज्याचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे आणि मी देखील मनापासून त्याचं स्वागत करतो. अशा प्रकारचे दिनविशेष म्हणजे नात्याला नवेपणा पुन्हा जागरूक करणारे आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर आजपर्यंत अनेक रोमँटिक सिनेमे बनले असतील.’

‘लॉ ऑफ लव्ह’
‘लॉ ऑफ लव्ह’
'लॉ ऑफ लव्ह’ हा सिनेमा प्रेमकथेपेक्षा प्रेमाचा एक वेगळाच पैलू दाखविणारा आहे. गुलाबी दुलईत पांघरलेल्या प्रेमापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीचं प्रेम आणि त्याची परिभाषा सांगणारा हा सिनेमा आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडतील असे एलिमेंट्स या चित्रपटात आहेत. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करत असल्यामुळे त्यात आपण जीव की प्राण ओतून काम करत असतो त्यामुळे माझी सह कलाकार शाल्वी शहा आणि इतर सगळी मंडळी यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज व्हावं हीच अपेक्षा” जे उदय यांनी सांगितले.
‘लॉ ऑफ लव्ह’
‘लॉ ऑफ लव्ह’
जे उदय निर्मित व अभिनित आणि सी एस निकम दिग्दर्शित ‘लॉ ऑफ लव्ह’ येत्या ९ एप्रिल ला सिनेमागृहांत प्रदर्शित होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.