ETV Bharat / sitara

'सारेगमप लिटील चॅम्प'चे नशेमुळं उद्ध्वस्त झालं होतं करिअर, इंडियन आयडॉलमधून करणार नवी सुरुवात

author img

By

Published : Oct 13, 2019, 5:58 PM IST

२०११ साली लोकप्रिय ठरलेल्या 'सारेगमप लिटील चॅम्प' या रिअॅलिटी शोमधून अजमत हुसैन हा अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. त्यावेळी तो अवघ्या १० वर्षांचा होता.

'सारेगमप लिटील चॅम्प'च्या विनरचं नशेमुळं उद्ध्वस्त झालं होतं करिअर, आता इंडियन आयडॉल मधुन करणार नवी सुरुवात

मुंबई - छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमुळे बरेच स्पर्धक अल्पावधीत लोकप्रिय होतात. त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी या शोच्या माध्यमातून मदत होते. आजवर या शोमधील बरेच स्पर्धक सुपरस्टार झाले आहेत. मात्र, बऱ्याच जणांना ही प्रसिद्धी सांभाळून ठेवता येत नाही. किंवा चुकीच्या निर्णयामुळे त्याचं करिअर सुरू होण्यापूर्वीच नष्ट होतं. अजमत हुसैन या स्पर्धकाबाबतही असंच काहीसं घडलं आहे.

२०११ साली लोकप्रिय ठरलेल्या 'सारेगमप लिटील चॅम्प' या रिअॅलिटी शोमधुन अजमत हुसैन हा अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. त्यावेळी तो अवघ्या १० वर्षांचा होता. त्याने या शोमधुन तुफान लोकप्रियता मिळवली. एवढंच काय, तर या शोचा तो विजेताही ठरला होता. मात्र, पुढे त्याला वाईट संगतीमुळे नशेचं व्यसन जडलं. त्याचा प्रभाव त्याच्या संगीत करिअरवर झाला.

हेही वाचा -फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत झळकणार अनुष्का?

आता सोनी टीव्हीवर लवकरच 'इंडियन ऑयडॉल' हा रिअॅलिटी शो सुरू होणार आहे. या कार्यक्रमातून अजमत त्याच्या करिअरची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनदरम्यान त्याने त्याच्या आयुष्यातील कठिण प्रसंगांचा उलगडा केला.

वाढत्या वयामुळे अजमतच्या आवाजात बदल होत गेला. त्यानंतर त्याने काही कार्यक्रम केले. मात्र, लोकांनी त्याचा आवाज आता खराब झाला आहे. तो गाणं गाऊ शकत नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या. लोकांच्या या प्रतिक्रिया पाहुन अजमत डिप्रेशनमध्ये गेला होता. डिप्रेशनमध्ये असतानाच त्याला नशेचं व्यसन जडलं. त्यामुळे त्याचं संगीत करिअरकडे दुर्लक्ष झालं. मात्र, काही चांगल्या लोकांनी त्याला यातून बाहेर काढुन पुन्हा संगीताकडे लक्ष देण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच पुन्हा रिअॅलिटी शोमध्ये परतण्याचा निर्णय घेतला, असल्याचं अजमतने ऑडिशनदरम्यान सांगितलं.

अजमतने ३ वर्षांपूर्वी गाणं सोडलं होतं. मात्र, इंडियन ऑयडॉलच्या १० व्या पर्वाचा विजेता सलमान अलीला पाहुन पुन्हा प्रेरणा निर्माण झाली. आता माझी पुन्हा नव्याने ओळख निर्माण करायची आहे, असंही तो यावेळी म्हणाला.

हेही वाचा -बिग बॉस 13 : नवाजुद्दीन अन् सलमानची जोडी वीकेंडला देणार प्रेक्षकांना किक!

इंडियन ऑयडॉलच्या ११ व्या पर्वाचं परिक्षण विशाल दादलानी, नेहा कक्कर आणि अनु मलिक हे करणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.