वॉशिंग्टन - किपिंग अप विथ द कर्दाशियन्सच्या आगामी एपिसोडमध्ये झळकणाऱ्या फॅशन मुघल खोले कर्दाशियनने आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचा खुलासा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिअॅलिटी स्टार आणि तिची आई क्रिस जेनर यांनी कोरोनाची बाधा झाली असल्याचे सांगितले आहे. खोलेची सुपरमॉडल बहीण किम कार्दाशियननेही कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये खोलेबद्दल चिंता व्यक्त केली होती.
हेही वाचा - किम कर्दाशियनने कोरोना काळात साजरा केला ग्रँड बर्थडे, झाली टीकेची धनी
“नुकताच मला कळले की मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मी माझ्या खोलीत आहे. सध्या ठीक आहे, पण गेले काही दिवस खरोखरच वाईट होते,” असे फॉक्स न्यूजने म्हटले आहे.
"मी मायग्रेनने ग्रस्त आहे, परंतु ही सर्वात त्रासदायक डोकेदुखी होती. हे मायग्रेनमुळे घडतय असे मला वाटायचे. मला खोकला यायचा तेव्हा छातीत जळजळ व्हायची.'', असे खोले म्हणाली.