मुंबई - कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आज इतिहास घडू शकतो. केबीसीच्या ११ व्या पर्वातील आजच्या भागाची सुरूवातच १ कोटीच्या प्रश्नापासून होणार आहे. १९ वर्षाचा युवक मंगळवारच्या भागात हॉट सीटवर पोहोचला. त्याने जबरदस्त खेळी करीत ५० लाखाच्या प्रश्नाचे उत्तर दिलंय. मात्र वेळेअभावी काल खेळ थांबवावा लागला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
केबीसीच्या या पर्वात एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचणारा हिमांशु हा पहिलाच पुरुष स्पर्धक आहे. यापूर्वी एका महिलेला हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तिला प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे तिने खेळ सोडला होता. या पार्श्वभूमीवर हिंमाशु एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देणार का हे आजच्या भागात कळेल.
हिंमाशु हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा स्पर्धक आहे. गव्हर्मेंट फ्लाईंग इन्स्टीट्यूटमध्ये तो शिकत आहे. पुढे जाऊन त्याला वैमानिक बनण्याची इच्छा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विशेष म्हणजे हिमांशु १ हजार ुपयाच्या पहिल्याच प्रश्नावर चुकला होता. त्याने पहिल्याच प्रश्नावर ऑडियन्स पोल घेतला होता. त्यानंतर १५ प्रश्नांची उत्तरे देऊन तो ५० लाख जिंकला आहे. आज त्याने जर १ कोटीच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले तर या पर्वातील तो पहिला करोडपती होईल.