जयपूर - अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची जोडी 'भूल भुलैय्या २' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारच्या 'भूल भुलैय्या' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. सध्या कार्तिक आणि कियारा जयपूर येथे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या सेटवर त्यांचा रोमॅन्टिक लुक असलेला एक फोटो कार्तिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- View this post on Instagram
Pyaar mein itne bhi andhe mat ho jao, Ki Chudail bhi na dikhein 😍🤣 #BhoolBhulaiyaa2 ☠️🔥
">
कार्तिक या चित्रपटाचे बरेच अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतो. त्याने कियारासोबतचा फोटो शेअर करुन त्यावर मजेदार कॅप्शनही दिले आहे. त्यांच्या अवतीभोवती केस विस्कटलेल्या काही तरुणी पाहायला मिळतात. 'प्यार में इतने भी अंधे मत हो जाओ, कि चुड़ैल भी न दिखे #भूल भुलैया २', असे मजेदार कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.
हेही वाचा -कार्तिकने राजस्थानच्या थंडीवर अशी केली मात, व्हिडिओ व्हायरल
कार्तिकने शेअर केलेल्या या फोटोवर कियारानेही मजेदार कमेट दिली आहे. त्यांच्या या फोटोला आत्तापर्यंत १० लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
कार्तिकने या चित्रपटाच्या सेटचे काही व्हिडिओ देखील आपल्या इन्सास्टोरीमध्ये शेअर केले आहेत. आमिर खानच्या 'रंग दे बसंती' चित्रपटाचा काही भाग ज्या किल्ल्यावर शूट करण्यात आला होता. तिथे सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
'भूल भुलैय्या २' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बझ्मी करत आहेत. या चित्रपटात तब्बुचीही खास भूमिका पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ३१ जुलै २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'भूल भुलैय्या २'च्या शूटिंगला सुरुवात; कार्तिक म्हणतो, या लुकमध्ये....