ETV Bharat / sitara

अॅक्शन हिरो ते देशभक्त; वाचा, अक्षय कुमारचा फिल्मी प्रवास -

अक्षयने २०१० पासून देशभक्तीवर आधारित चित्रपट साकारले आहेत

अक्षय कुमारचा फिल्मी प्रवास
author img

By

Published : Mar 31, 2019, 11:17 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अक्षयने मागच्या एक-दोन वर्षांमध्ये बॅक टू बॅक सुपरडुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचा अलिकडेच प्रदर्शित झालेला 'केसरी' चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला भरघोस यश मिळाले आहे. मात्र, सुरुवातीला 'अॅक्शन हिरो' म्हणून नावाजलेला अक्षय आता देशभक्तीवर आधारित चित्रपटांतून प्रसिद्ध होऊ लागला आहे. पाहुया त्याच्या चित्रपट करिअरचा प्रवास....

अक्षयने २०१० पासून देशभक्तीवर आधारित चित्रपट साकारले आहेत. या चित्रपटांनी अक्षयच्या सुरुवातीच्या चित्रपटांचे विक्रम मोडले. १९९२ ते १९९९ या काळात त्याने अॅक्शनपटांमध्ये भूमिका साकारल्या. २००० ते २०१० पर्यंत त्याने रोमॅन्टिक आणि कॉमेडी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली. त्यानंतर २०१० पासून ते आत्तापर्यंतच्या काळात त्याने सर्व देशभक्तीने प्रेरीत असलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. या तीन श्रेणींचे विभाजन केले, तर त्याच्या देशभक्तीशी प्रेरीत असलेल्या चित्रपटांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्याच्या करिअरमध्ये या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले.

१९९१-१९९९ - अॅक्शन हिरो

या काळात अक्षयने ८३ टक्के चित्रपट हे अॅक्शनपट असलेले साकारले आहेत. त्याने १९९१ मध्ये 'सौगंध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर लगेच १९९२ मध्ये त्याचा 'खिलाडी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातूनच त्याला 'खिलाडी' अशी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर 'कायदा कानुन' (१९९३), 'मोहरा' (१९९४), 'मैदान ए जंग' (१९९५), 'इंसाफ' (१९९७) आणि 'जानवर' (१९९९) या चित्रपटातून अक्षयला अॅक्शन हिरो म्हणून लोकप्रियता मिळाली.

२०००-२०१० - रोमॅन्टिक-कॉमेडी हिरो

अक्षयला रोमॅन्टिक चित्रपटातूनही चांगली लोकप्रियता मिळाली होती. या काळात अक्षयने ४५ चित्रपटात भूमिका साकारली. यापैकी ५५.६ टक्के चित्रपट हे कॉमेडी आणि रोमॅन्टिक होते. यामध्ये 'हेराफेरी', 'फिर हेराफेरी', 'गरम मसाला', 'भागम-भाग', 'हे बेबी', 'वेलकम' आणि 'सिंग इझ किंग' या चित्रपटांचा समावेश आहे.

अक्षयने याच काळापासून 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो', 'पोलीस फोर्स' आणि 'आन' यांसारख्या देशभक्तीवर आधारित चित्रपटात भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

अॅक्शन आणि रोमॅन्टिक-कॉमेडी चित्रपटानंतर अक्षयने देशभक्तीवर आधारित असलेल्या आणि सामाजिक चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 'स्पेशल-२६', 'हॉलिडे', 'बेबी' 'टॉयलेट-एक प्रेम कथा', 'पॅडमॅन' आणि 'गोल्ड' आणि आता 'केसरी' या चित्रपटातून त्याने देशभक्ती आणि सामाजिक संदेश देण्यास सुरुवात केली आहे.

एवढंच नाही तर, तो आगामी काळातही बऱ्याच देशभक्तीपर आणि सामाजिक संदेश असणाऱ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये 'मिशन मंगल', 'पृथ्वीराज चौहाण' आणि 'सुर्यवंशी' या चित्रपटांचा समावेश असणार आहे.

Intro:Body:

अॅक्शन हिरो ते देशभक्त; वाचा, अक्षय कुमारचा फिल्मी प्रवास

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.