नवी दिल्ली - अभिनेता जान्हवी कपूर हिने गुरुवारी जाहीर केले, की तिचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' 12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक शॉर्ट जीआयएफ पोस्ट केला आहे आणि सहकलाकार पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांनी या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली. "युद्धात सहभागी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला वायुसेनेच्या अधिकाऱ्याची कहाणी तुमच्यापर्यंत घेऊन आल्याचा अभिमान आहे. मला आशा आहे, की या प्रवासाने मला ज्याप्रकारे प्रेरणा मिळाली तशी तुम्हाला प्रेरणा मिळेल", असे लिहित तिने गुंजन सक्सेना : कारगिल गर्ल १२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत असल्याचे जाहीर केले आहे. या चित्रपटात युद्धात पराक्रम गाजवलेल्या पहिल्या भारतीय महिला वायूदल अधिकारी गुंजना सक्सेनाची कथा पाहायला मिळणार आहे. गुंजनची भूमिका अभिनेत्री जान्हवी कपूर साकारत आहे.
युद्धात उडणाऱ्या पहिल्या महिला वैमानिकांपैकी एक असलेल्या सक्सेनाने 1999मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी जखमी सैनिकांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि युद्धाच्या काळात धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य वीर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. शरण शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, विनीतकुमार सिंग, अंगद बेदी आणि मानव विज यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आगामी बायोपिकची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ यांनी केली आहे.