ETV Bharat / sitara

'तुझी दररोज आठवण येते', श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवी भावुक - Janhvi Kapoor news

श्रीदेवी यांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का हा त्यांच्या कुटुंबीयांसाठी होता. त्यांचे पती बोनी कपूर तसेच मुली जान्हवी आणि खुषी नेहमीच त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात.

Janhvi Kapoor Pens emotional note for Shridevi on her second Death Anniversary
'तुझी दररोज आठवण येते', श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवी भावुक
author img

By

Published : Feb 24, 2020, 9:00 AM IST

मुंबई - बॉलिवूडची 'चांदणी' म्हणून प्रत्येकाच्या हृदयावर राज्य गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचा आज दुसरा स्मृतिदीन आहे. त्यांच्या अकाली एक्झिटने कलाविश्वासोबतच त्यांच्या चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. २०१८ साली श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. आज जरी त्या या जगात नसल्या तरीही त्यांच्या आठवणी त्यांच्या चाहत्यांच्या मनात रुजलेल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय तर अजूनही त्यांच्या आठवणीत भावुक होताना दिसते.

श्रीदेवी यांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का हा त्यांच्या कुटुंबीयांसाठी होता. त्यांचे पती बोनी कपूर तसेच मुली जान्हवी आणि खुषी नेहमीच त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. आज श्रीदेवी यांना जाऊन २ वर्ष झाली आहेत. तरीही त्यांची दररोज आठवण येत असल्याचे जान्हवीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

जान्हवीने श्रीदेवी यांच्यासोबत तिचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवींनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या लाडक्या लेकीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्या खूप उत्सुक होत्या. जान्हवीला त्यांनी अभिनयाचे धडे देखील दिले होते.

जान्हवीच्या आगामी चित्रपटांबाबत सांगायच तर, लवकरच ती 'कारगिल गर्ल गुंजन सक्सेना' यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटातही तिची भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेता राजकुमार रावसोबत 'रुही अफ्जा' या चित्रपटातही तिची मुख्य भूमिका आहे. तर, वरुण धवनसोबत 'मिस्टर लेले' चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.