मुंबई - २०२० ला निरोप देण्यासाठी अभिनेत्री इशा गुप्ताने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवरील स्टॉक फोटोमध्ये अभिनेत्री बेडवर अपर बॉडी ताणताना दिसत आहे.
तिने फोटोला कॅप्शन देताना लिहिले, "वी मेड इट थ्रू डिसेंबर. माझ्या कुटुंबातील आणि मित्रांच्या चांगल्या आरोग्याबद्दल आभार, प्रेम करणाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे मी धन्य झाले आहे. आज रात्रीच्या वुल्फ मुनसाठी तयार आहे. बाय २०२०."
अभासी जगामुळे तरुणाई खाईच्या गर्तेत
काही महिन्यापूर्वी मॉडेल अभिनेत्री इशा गुप्ताने REJCTX या वेब सिरीजमधून पहिल्यांदाच डिजीटल क्षेत्रात पदार्पण केले. अभासी जगामुळे नवीन पिढी वासना, लोभ आणि गुन्हेगारीवृत्तीकडे आकर्षित झाली असल्याचे इशाने म्हटले होते.
लैंगिक गुन्ह्यात वाढ
आपला विषय स्पष्ट करताना ती म्हणाली होती,"ओव्हर एक्सपोजरमुळे यंगस्टर्सच्या लैंगिक गुन्हेगारीतही वाढ होत आहे. नवीन नातेसंबंध आणि शक्यतांचा शोध घेण्यास, डेटिंग आणि इतर साहस करण्याच्या विरोधात नाही. पण मी सोशल मीडियामुळे जास्तच वाढलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आहे. मी फक्त "वर्च्युअल वर्ल्डपेक्षा यंगस्टर्सने आपले आयुष्य खर्या जगात अधिक जगावे अशी अपेक्षा करते."
हेही वाचा - २०२० : सर्वाधिक कमाई 'तान्हाजी' आणि 'बागी ३' ची, १०० कोटी क्लबमध्ये केवळ २ सिनेमे