ETV Bharat / sitara

‘वेल डन बेबी’ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - ‘वेल डन बेबी’ अमॅझॉन प्रायमवर

वेल डन बेबी हा मराठी चित्रपट येत्या ९ एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचीही एक धमाल व्यक्तीरेखा पाहायला मिळत आहे. ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

Well Done Baby'
‘वेल डन बेबी’
author img

By

Published : Apr 1, 2021, 5:22 PM IST

‘वेल डन बेबी’ हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी गुढीपाडव्याची भेट असणार आहे. प्रियंका तन्वर यांचे दिग्दर्शन असलेल्या या फॅमिली ड्रामामध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यासारखे लोकप्रिय मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मर्मबंध गव्हाणे यांनी लिहिले असून ट्रेलरमधून त्याच्या खुशखुशीतपणाची झलक दिसते. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर मराठी चित्रपट ‘वेल डन बेबी’ चा प्रीमियर होणार या बातमीने तो सध्या चर्चेत आहे. त्यांनी वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा ट्रेलर सादर केला.

Well Done Baby'
‘वेल डन बेबी’ चित्रपटाचे पोस्टर
मीरा आणि आदित्य (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) यांचं आयुष्य आणि नवरा-बायको म्हणून त्यांच्यासमोरील आव्हाने यात डोकावण्याची संधी या ट्रेलरमुळे मिळते. आधीच गुंतागुंत झालेल्या या नात्यात भर पडते आदित्यच्या सासूची. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या काहीशा सगळ्यात लुडबुड करणाऱ्या सासूमुळे ही कथा अधिकच रंजक आणि गमतीशीर बनली आहे.वेल डन बेबी प्रदर्शित होत असल्याची नुकतीच झालेली घोषणा आणि त्यापाठोपाठ आलेला ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. चित्रपटाच्या चित्रझलकीमध्ये आधुनिक काळातील एका तरुण जोडप्याच्या आयुष्याची झलक आहे. हे जोडपं आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, नशीबच त्यांना बाळाच्या रुपात तो उद्देश देऊ करते. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसने सादर केला आहे. भारतातील प्राइम सदस्यांना पाडव्याच्या काही दिवस आधी म्हणजेच ९ एप्रिल २०२१ रोजी हा सिनेमा अमेझॉन प्राइम व्हिडीओवर अनन्य-विशेष पद्धतीने स्ट्रीम होणार आहे.हेही वाचा - खासदार किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर, अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.