ETV Bharat / sitara

‘रॉकेट बॉईज'मधून उलगडणार होमी जे भाभा आणि विक्रम ए साराभाई यांचा जीवनपट!

author img

By

Published : Jun 24, 2021, 2:54 PM IST

अभिनेता जिम सर्भ व इश्‍वाक सिंग हे कलाकार 'रॉकेट बॉईज' या वेब सिरीज मध्ये एकत्र आणि प्रमुख भूमिकांतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. सोनीलिव्‍हची आगामी ओरिजिनल 'रॉकेट बॉईज' भारताच्‍या नामांकित भौतिकशास्‍त्रज्ञांच्‍या जीवनाला अधोरेखित करणार आहे.

rocket-boys
‘रॉकेट बॉईज

‘नीरजा’, ‘पद्मावत’, ‘संजू’ सारख्या तारांकित चित्रपटांतून झळकलेले जिम सर्भ त्याच्या अनोख्या लूकसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याची अभिनयशैली त्याला नोटीस करायला भाग पडते. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित ‘पाताल लोक’ मधील भूमिकेतून अभिनेता इश्‍वाक सिंग नावारूपास आला. त्याने ‘विरे दि वेडिंग’, ‘मलाल’, ‘अलिगढ’ सारख्या चित्रपटांतूनही भूमिका केल्या असून सध्या तो अनेक प्रोजेक्टसमध्ये बिझी आहे. या दोघांबद्दल सांगायचं कारण म्हणजे जिम सर्भ व इश्‍वाक सिंग हे कलाकार 'रॉकेट बॉईज' या वेब सिरीज मध्ये एकत्र आणि प्रमुख भूमिकांतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

सोनीलिव्‍हची आगामी ओरिजिनल 'रॉकेट बॉईज' भारताच्‍या नामांकित भौतिकशास्‍त्रज्ञांच्‍या जीवनाला अधोरेखित करणार आहे. हा शो होमी भाभा व विक्रम साराभाई यांची कथा आणि महानता व इतिहासामधील त्‍यांच्‍या कामगिरीच्‍या त्‍यांच्‍या प्रवासाला दर्शविणार आहे. या दोन महान विचारवंतांनी दूरदर्शी दृष्टिकोन सादर करण्‍यासोबत त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना सत्‍यात उतरवण्याचे धाडस देखील दाखवले. त्‍यांनी सुरू केलेल्‍या मार्गामधून काही महान वैज्ञानिक शोध समोर आले. तर अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकांत जिम सर्भ व इश्‍वाक सिंग हे गुणी नट दिसणार आहेत.

जिम सर्भ म्हणाला की, “'रॉकेट बॉईज' ही सिरीज भारतीय वैज्ञानिक इतिहासामधील प्रतिष्ठित व्‍यक्‍ती विक्रम साराभाई व होमी भाभा यांच्‍याबाबत आहे. मी आशा करतो की, त्‍यांच्‍या कथा भावी वैज्ञानिक, संशोधक व नवप्रवर्तकांच्‍या पिढीला प्रेरित करत राहतील. सध्‍याच्‍या विलक्षण काळामध्‍ये विज्ञान, वैज्ञानिक संशोधन व नवोन्‍मेष्‍काराचे संबंध, शक्‍यतो जीवनदायी तंत्रज्ञान पूर्णत: आवश्‍यक बनले आहे. मी सोनीलिव्‍हवर ही सिरीज प्रसारित होताना पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.''

इश्‍वाक सिंग म्हणाला, ''मी कलाकार, तसेच भारतीय म्‍हणून या संकल्‍पनेकडे आकर्षून गेलो. विक्रम साराभाई सारखी वास्‍तविक जीवनातील व्‍यक्तिरेखा साकारण्‍याची वारंवार संधी मिळत नाही. त्‍यांनी प्रतिष्ठित वैज्ञानिक वारसामध्‍ये अभिमानास्‍पद कामगिरी केली आहे. 'रॉकेट बॉईज' ही निखिल अडवानीसोबत माझी दुसरी सिरीज आहे आणि टीमने या भूमिकेसाठी माझी निवड केल्‍याने मी त्‍यांचे आभार मानतो.''

निखिल अडवानी, रॉय कपूर फिल्‍म्‍स आणि एम्‍मी एंटरटेन्‍मेंट च्या बॅनरखाली तयार झालेला आणि अभय पन्‍नू यांचे दिग्‍दर्शन आणि सिद्धार्थ रॉय कपूर, मोनिषा अडवानी, मधू भोजवानी, निखिल अडवानी यांची निर्मिती असलेला हा शो प्रेक्षकांना भूतकाळाची सफर घडविणार आहे. आजही प्रचलित असलेली होमी भाभा व विक्रम साराभाई यांची महानता व त्यांच्या देशोपयोगी कार्यांना उजागर करण्यात येणार आहे. इश्‍वाक सिंग विक्रम ए साराभाई, तर जिम सर्भ होमी जे भाभा यांच्या भूमिका ‘रॉकेट बॉईज’ मधून साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा - स्व-घोषित समीक्षक कमाल आर खानची रिव्ह्यू लिहणे सोडू देण्याची घोषणा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.